नवी दिल्ली, 10 मार्च: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टींची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. मग ते व्हिडीओ असो किंवा फोटो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) दोन तरुणांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे तरुण पारंपारिक वाद्य वाजवत अतिशय सुंदर पद्धतीने महादेवाचं गाणं गात आहेत. या व्हिडीओला सध्या खूपच लाइक्स मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Marendra Modi) या तरुणांची कला एवढी आवडली की त्यांनी तो व्हिडीओ आपल्या ट्विटर (Twitter) अकाउंटवरुन शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'बहुत बढ़िया!' असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की हे दोन तरुण कलाकार वाद्य वाजवून आपल्या गाण्याने लोकांची मनं जिंकत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तरुणांच्या या व्हिडीओला 52 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी भरभरुन कमेंट्स करत या तरुणांच्या कलेचं खूपच कौतुक केलं आहे.
बहुत बढ़िया! https://t.co/55ViOzefjQ
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2021
आपल्या देशात टॅलेंटची काही कमतरता नाही. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला अनेक टॅलेंटेड लोकं सापडतील. अशा लोकांची कला आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी पहायाला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अशा कलाकारांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त (international women's day) देशवासियांना संबोधित करत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. त्यांनी महिला बचत गट आणि उद्योजकांनी तयार केलेली उत्पादनं खरेदी केली. महिला दिनानिमित्त ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'भारताला महिलांनी केलेल्या सर्व कामगिरीबद्दल खूप अभिमान आहे.'
Women are playing a leading role in India’s quest to become Aatmanirbhar. On International Women’s Day, let us commit to encouraging entrepreneurship among women.
Today, I bought a few products that celebrate women enterprise, creativity and India’s culture. #NariShakti — Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021
(हे वाचा - West Bengal Election 2021: भाजपनं मिथुन यांचीच निवड का केली? वाचा कसा होणार फायदा)
पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये तामिळनाडूतील टोडा जमातीच्या कारागिरांनी तयार केलेली शाल, गोंड पेपर पेंटिंग, पारंपारिक नागा शाल, आसामचा पारंपारिक गमछा, केरळचा निलाविलक्कू (विशेष प्रकारचा दिवा), पश्चिम बंगालमधील जूटपासून तयार केलेला फाइल फोल्डर आणि मधुबनी पेंटिग असलेला खादीचा स्टोल यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pm modi, Social media, Tweet, Twitter