लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

Howdy Modi : ह्यूस्टनमधील भारतीय अमेरिकी नागरिकांनी पंतप्रधान मोदींसाठी 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.

  • Share this:

ह्यूस्टन, 22 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. लोकसभा निवडणूक 2019मध्ये घवघवीत यश मिळवत नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान येथे होणारी यूएनजीएची (UNGA)बैठक आणि 'हाउडी मोदी' (Howdy Modi) हे कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. टेक्सासमधील ह्यूस्टन शहरातील NRG फुटबॉल स्टेडिअमवर 'हाउडी मोदी' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या नावावर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की याचे आयोजन विशेषतः पंतप्रधान मोदींसाठी करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. ह्यूस्टनमधील भारतीय अमेरिकी नागरिकांनी पंतप्रधान मोदींसाठी 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. यावेळी भल्यामोठ्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी भव्यदिव्य सभेला संबोधित देखील करणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्पदेखील 'हाउडी मोदी' कार्यक्रमात राहणार उपस्थित

'हाउडी मोदी' हा कार्यक्रम तीन तासांचा असणार आहे. या कार्यक्रमास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील हजर राहणार आहेत. तब्बल 30 मिनिटांचं भाषण देखील ते देणार आहेत. अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्ष श्रृंगला यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा शुक्रवारी आढावा घेतला.

(वाचा : VIDEO: भाव नाही तरी म्हणे आम्हीच राव! अमेरिकेच्या एअरपोर्टवर पाक PMची झाली फजिती)

जाणून घेऊया काय आहे 'हाउडी मोदी' मेगा इव्हेंट...

'हाउडी मोदी' म्हणजे काय?

'Howdy' हा शब्द 'How do you do' याचं संक्षिप्त रूप आहे. 'Howdy' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'तुम्ही कसे आहात'. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये 'Howdy' या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे.

(वाचा : प्रचाराचा नारळ फोडत अमित शहांनी जाहीर केला भावी मुख्यमंत्री, शिवसेनेचा पत्ता कट?)

पंतप्रधान मोदींसाठी मेगा इव्हेंटचं आयोजन

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक)या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 5 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे पोप यांच्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नेत्याच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. मोदींच्या भाषणापूर्वी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जाणार आहे. केवळ डोनाल्ड ट्रम्पच नाही तर अमेरिकेचे कित्येक खासदारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

(वाचा :  अमेरिकेत पोहोचलेल्या PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव, असं नेमकं काय केलं पाहा VIDEO)

दरम्यान, रविवारी (22 सप्टेंबर) सकाळीच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. यावेळेस ह्यूस्टन विमानतळावर एक अशी घटना घडली की ते दृश्य पाहून लोकांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव सुरू आहे. पंतप्रधान मोदींचं स्वच्छता प्रेम केवळ देशातच नाही तर परदेशातही सर्वश्रुत आहे. अमेरिकेच्या धरतीवरूनही मोदींनी स्वच्छता अभियानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. विमानतळावर अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी  पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. यादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला अधिकाऱ्यानं पंतप्रधान मोदींचं स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ भेट स्वरुपात दिला. यावेळेस फुलांच्या गुच्छ्यातील एक दांडी खाली जमिनीवर पडली. ही बाब जशी पंतप्रधानांच्या लक्षात आली तसं त्यांनी लगेचच स्वतः खाली वाकून ती उचलली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याच्या हातात दिली.

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. एका युजरनं पंतप्रधानांचं कौतुक करत लिहिलंय की,'भलेही दिसायला ही गोष्ट फार छोटी दिसत असेल, पण याच साधेपणानं त्यांना एक मोठा नेता बनवलं आहे.' यापूर्वीही अशा अनेक उदाहरणांमधून पंतप्रधान मोदींनी आपलं स्वच्छता प्रेम दाखवून दिलं आहे.

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

Published by: Manoj Khandekar
First published: September 22, 2019, 2:31 PM IST

ताज्या बातम्या