पंतप्रधानांच्या सभांनाही बसला 'फानी'चा तडाखा, वादळ धडकण्याचा धोका

पंतप्रधानांच्या सभांनाही बसला 'फानी'चा तडाखा, वादळ धडकण्याचा धोका

आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांत निवडणुका झाल्या असल्या तरी पश्चिम बंगालमध्ये अजून तीन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. फानी वादळाचा धोका असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमधली सभाही रद्द झाली आहे.

  • Share this:

कोलकाता, 2 मे : आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना फानी वादळाचा धोका असल्यामुळे किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या राज्यांत नौदल, तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांत निवडणुका झाल्या असल्या तरी पश्चिम बंगालमध्ये अजून तीन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. फानी वादळाचा धोका असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमधली सभाही रद्द झाली आहे.

पूर्व मिदनापूरमध्ये तुमलुक आणि झारग्राम या दोन ठिकाणी होणाऱ्या मोदींच्या सभा रद्द झाल्या. या सभा 5 मे ला होणार होत्या. आता त्या सभा 6 मे ला होतील.

900 तात्पुरते निवारे

'फानी' वादळाची तीव्रता अधिक असल्यामुळे सगळीकडेच खबरदारी घेण्यात येत आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांत 900 ठिकाणी तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत.

नौदल आणि तटरक्षक दलाची जहाजं आणि हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.त्याचबरोबर लष्कर आणि हवाई दलाची पथकंही तयार आहेत.

युद्धपातळीवर तयारी

किनारपट्टीवरच्या भागात जिथे वादळाचा धोका जास्त आहे तिथल्या सगळ्या रहिवाशांना हलवण्याचे आदेश ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिले आहेत. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला तर लवकरात लवकर तो सुरळित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

या वादळाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ओडिशा, आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांना आधीच 1 हजार 86 कोटी रुपयांची मदत दिली आहे.

आंध्र प्रदेशमध्येही खबरदारी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे. वादळामुळे नुकसान झालं तर मदत पुरवता यावी यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी हे पत्र लिहिलं आहे.

ओएनजीसीने बंगालच्या उपसागरात असलेल्या तेलखाणींमध्ये काम करणाऱ्या 480 कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

=======================================================================

SPECIAL REPORT : अशा प्रकारे माओवाद्यांनी केला भ्याड हल्ला

First published: May 2, 2019, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading