VIDEO... म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं बिग बी अमिताभ यांचं कौतुक, शेअर केला हा VIDEO

VIDEO... म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं बिग बी अमिताभ यांचं कौतुक, शेअर केला हा VIDEO

बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या आवाहनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा एक व्हिडिओ रिट्वीट केला.

  • Share this:

मुंबई, 1 जुलै : पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अनेक भारतीयांना या जीवनस्रोतापासून वंचित राहावं लागतं. याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन मन की बात च्या माध्यमातून जलशक्ती अभियानाविषयी सांगितलं. याला पाठिंबा देत बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक आवाहन केलं. जलशक्ती अभियानाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. भारत सरकार पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या भागात जलसंधारणाचं कसं काम करणार आहे, याविषयी अमिताभ यांनी यात माहिती दिली आहे. साध्या शब्दांत आणि प्रभावी पद्धतीने पाणी वाचवण्याचं साधं पण महत्त्वाचं कर्तव्य अमिताभ यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'संचय जल बहतर कल' अशी घोषणा करत अमिताभ या अभियानात सामील झाले आहेत. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ रिट्वीट केला.अमिताभ यांचे शब्द प्रेरणादायी आहेत. यामुळे प्रत्येकाला जलसंधारणाचं महत्त्व समजेल. पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जण पुढे येईल, असं मोदींनी लिहिलं आहे.

अमिताभ यांच्याप्रमाणे अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पानी फाउंडेशनचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं. आमीर खानचं एक ट्वीट रीट्वीट करत पंतप्रधानांनी आमीरच्या पाण्याविषयीच्या उपक्रमाचं कौतुक केलं.

एकाही भारतीयाचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होऊ नये, हे मिशन घेऊन नेटवर्क18 ने Mission Paani हा उपक्रम सुरू केला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे देशाच्या उत्पन्नापैकी 6% वाया जाण्याचा धोका आहे. पाणी वाचवा. एकाही भारतीयाचा पाण्याविना मृत्यू होऊ नये म्हणून #MissionPaani मध्ये सहभागी व्हा. भारतात दरवर्षी 2 लाख लोकांचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. उद्याच्या भल्यासाठी पाणी वाचवा. Network18 च्या #MissionPaani मध्ये सहभागी व्हा.

या वर्षी भीषण उन्हाळ्याचा भारताच्या मोठ्या भागाला तडाखा बसला. पाण्याच्या काही थेंबांसाठी अनेकांना मैलोन मैल पायपीट करावी लागली. पाण्याच्या दुर्भिक्षावर उपाय शोधण्यासाठी Network18 ने #MissionPaani उपक्रम सुरू केला आहे. पाणी वाचवा. एकाही भारतीयाचा पाण्याविना मृत्यू होऊ नये म्हणून #MissionPaani मध्ये सहभागी व्हा.

First published: July 1, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading