परीक्षा पे चर्चा : PM मोदी देणार अभ्यासाचा मंत्र, महाराष्ट्रातले 104 विद्यार्थी सहभागी होणार

परीक्षा पे चर्चा : PM मोदी देणार अभ्यासाचा मंत्र, महाराष्ट्रातले 104 विद्यार्थी सहभागी होणार

देशभरातले 2 हजार विद्यार्थी हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जानेवारी : सगळ्या विद्यार्थ्यांना आता परिक्षांचे वेध लागले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासून सगळ्यांच्या परिक्षांना सुरुवात होत असते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देभशरातल्या विद्यार्थ्यांशी 'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. 20 जानेवारीला राजधानी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. 16 फेब्रुवारी 2018 ला पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला होता. यावर्षीचा कार्यक्रम हा या उपक्रमातला तीसरा कार्यक्रम ठरणार आहे. महाराष्ट्रातून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 104 विद्यार्त्यांची निवड करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यातच पंतप्रधानांनी ट्विटरवरून या कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्याच बरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एक परिक्षा द्यावी लागली. या परिक्षेची घोषणाही पंतप्रधानांनी केली होती. 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा होती.

या परिक्षेतून जे विद्यार्थी निवडले गेले त्यांना 20 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहायला मिळणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने MyGov या सरकारच्या वेबसाईटनरून ही परिक्षा घेतली होती. त्यात विद्यार्थ्यांना विविध 5 विषय देण्यात आले होते. त्यावर 1,500 शब्दांमध्ये निबंध लिहून पाठवायचा होता.

We support CAA and NRC, तरुणाने दिला लग्नपत्रिकेतून संदेश

सगळीच प्रोसेस ऑनलाईन ठेवण्यात आली होती. या परिक्षेसाठी 3 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातले 2 हजार विद्यार्थी हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 08:29 PM IST

ताज्या बातम्या