त्रिपुरातला विजय हा शुन्यातून शिखरापर्यंतचा प्रवास -पंतप्रधान मोदी

त्रिपुरातला विजय हा शुन्यातून शिखरापर्यंतचा प्रवास -पंतप्रधान मोदी

हा शुन्यातून शिखरापर्यंतचा मोठा प्रवास आहे. हा विजय प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे.

  • Share this:

03 मार्च : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने शानदार विजय मिळवलाय. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून कार्यकर्त्यांचा अभिनंदन केलंय. तसंच हा शुन्यातून शिखरापर्यंतच मोठा प्रवास आहे असा आनंदही व्यक्त केलीय

त्रिपुरात डाव्यांच्या गडाला सुरुंग लावत 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच कमळ उमललंय. 59 पैकी 36 जागा जिंकत भाजपने सत्तेवर विराजमान झाली आहे. भाजपच्या गोटात या विजयाबद्दल जल्लोष साजरा होत आहे. पंतप्रधान मोदीही या विजयात सहभागी झाले आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करत आनंद साजरा केलाय.

पंतप्रधान मोदी म्हणतात, हा शुन्यातून शिखरापर्यंतचा मोठा प्रवास आहे. हा विजय प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचा हा निकाल आहे असं म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांची पाठ थोपाटलीये. तसंच त्यांनी त्रिपुरा,मेघालय आणि नागालँडच्या नागरिकांचेही आभार मानले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2018 06:01 PM IST

ताज्या बातम्या