Pulwama हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कृत्याची शिक्षा मिळणारच, मोदींचा इशारा

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी देशाची प्रतिक्रिया आहे तिच माझीही प्रतिक्रिया आहे. ही वेळ आता राजकीय -आरोप प्रत्यारोपांची नाही. तर पाकिस्तानला आपली ताकद दाखवण्याची आहे' असं मोदी म्हणाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2019 02:40 PM IST

Pulwama हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कृत्याची शिक्षा मिळणारच, मोदींचा इशारा

झाशी, 15 फेब्रुवारी : जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे असा कठोर इशार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गुरुवारी काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते झाशीमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. दहशतवादीविरोधातल्या कारवाईला आता वेग मिळणार आहे. हा हल्ला केलेल्या गुन्हेगारांना माफ करणार नाही. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळणारच. पाकिस्तान उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी लष्कराला सगळ्या प्रकारच्या कारवाईकरता पूर्ण सूट दिली आहे. सैन्याच्या ताकदीवर देशाला पूर्ण विश्वास आहे. आणि देश त्यांच्या पाठीशी आहे' अशा शब्दात पंतप्रधानांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानला आता धडा शिकवावाच लागणार आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी देशाची प्रतिक्रिया आहे तिच माझीही प्रतिक्रिया आहे. ही वेळ आता राजकीय -आरोप प्रत्यारोपांची नाही. तर पाकिस्तानला आपली ताकद दाखवण्याची आहे' असं मोदी म्हणाले आहे.

'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Loading...

-पंतप्रधान मोदींकडून शहिदांना श्रद्धांजली

-दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त उसळत आहे, याची मला जाणीव

-मला आपल्या सैनिकांच्या शौऱ्यावर पूर्ण विश्वास

-तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, दहशतवादी संघटनांना मोदींचा इशारा

-दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याचा परिणाम भोगावा लागणार

या कुरापतींनी आणि भ्याड हल्ल्याने भारतात अस्थिरता पसरेल असं शेजारी देशाला वाटत असेल तर चुकीचं असल्यांच पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या वाटेने तुम्ही चालला आहात तो उद्ध्वस्त करणारा रस्ता असून याचे सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. सर्व देशांनी दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.

हेही वाचा : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचं असं आहे चीन कनेक्शन

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला :

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे.

या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.


VIDEO : हाऊ इज द जोश? आता खरा जोश दाखवा : शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...