मराठी बातम्या /बातम्या /देश /आमच्या मुलींना न्याय मिळणारच, कठुआ गँगरेप प्रकरणी मोदींनी सोडले मौन

आमच्या मुलींना न्याय मिळणारच, कठुआ गँगरेप प्रकरणी मोदींनी सोडले मौन

देश आणि समाज म्हणून आम्हाला याची लाज वाटते. देशाचा मुलींना नक्की न्याय मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

देश आणि समाज म्हणून आम्हाला याची लाज वाटते. देशाचा मुलींना नक्की न्याय मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

देश आणि समाज म्हणून आम्हाला याची लाज वाटते. देशाचा मुलींना नक्की न्याय मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

    नवी दिल्ली, 13 एप्रिल : कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं. देश आणि समाज म्हणून आम्हाला याची लाज वाटते. देशाचा मुलींना नक्की न्याय मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

    आज संध्याकाळी नवी दिल्लीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी कठुआ आणि उन्नाव गँगरेप प्रकरणावर दुख व्यक्त केलं. या दोन्ही घटना कोणत्याही सभ्य समाजाचा भाग होऊ शकत नाही. एक देश, एक समाज म्हणून आम्हाला याची लाज वाटतेय. संपूर्ण देशाला विश्वास देऊ इच्छितो की, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. देशाच्या मुलींना नक्की न्याय मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

    देशातील कोणत्याही राज्यात घडणारी अशी घटना आमल्या  मानवतेला कलंक आहे. अशा घटनातील कोणताही आरोपीला सोडणार नाही, न्याय होणार आणि पूर्ण होणारच. समाज म्हणून आपल्याला पुढे येऊन याविरोधात लढा द्यायचा आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

    याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टि्वट करून या प्रकरणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का आहे ?, असा सवाल केला होता.

    First published:
    top videos

      Tags: Narendra modi