बजेटनंतर बोलताना मोदींनी केलं मध्यमवर्गाचं 'असं' केलं कौतुक; म्हणाले....

बजेटनंतर बोलताना मोदींनी केलं मध्यमवर्गाचं 'असं' केलं कौतुक; म्हणाले....

बजेटनंतर मोदींनी दूरदर्शनच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. या त्यांच्या निवेदनात त्यांनी मध्यमवर्गीयांची स्तुती केली. लोककल्याणाचं क्रेडिट मध्यमवर्गाला देऊन टाकलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी गरिबांचं कल्याण करण्यासाठी मध्यमवर्गाच्या प्रामाणिकपणामुळेच मिळतो निधी, असं स्पष्टपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमवर्गाचं मुक्तकंठाने कौतुक केलं. बजेटनंतर मोदींनी दूरदर्शनच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. या त्यांच्या निवेदनात त्यांनी मध्यमवर्गीयांची स्तुती केली.

मध्यमर्गीयांची नियमांचं पालन करण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा यामुळे करसंकलन सुलभ होतं. या वर्गाला करातून थोडा दिलासा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. या वेळी सरकारने 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत सरकारने मध्यमवर्गीय नोकरदारांना दिलासा दिला आहे, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांना सशक्त करणं हे सरकारचं कर्तव्य मानतो, म्हणूनच शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या आहेत असं मोदी म्हणाले. पीएम किसान योजनेचं महत्त्व सांगताना ते म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी पैसा देणारी पहिली मोठी योजना आम्ही सादर केली आहे. १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल."  अर्थसंकल्पात उल्लेखलेली ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना पहिल्यांदा 6000 रुपये मिळणारे आहेत.

सर्वव्यापी, सर्वस्पर्षी, सर्वसमावेशक  आहे, असं सांगत त्यांनी अरुण जेटली, पियूष गोयल आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली.

पशुपालन, गौसंवर्धन, मत्स्यपालन या क्षेत्रांचाही या बजेटमध्ये विशेष लक्ष देण्यात आल्याचं ते म्हणाले. कामधेनू आयोग आणि मत्स्यपालन क्षेत्रामुळे अनेकांना मदत होईल. शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा मोदींनी पुनरुच्चार केला.

First published: February 1, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading