PM Narendra Modi : मोदींच्या भाषणाचा हा आहे अर्थ; हे आहेत 18 मुख्य मुद्दे

PM Narendra Modi : मोदींच्या भाषणाचा हा आहे अर्थ; हे आहेत 18 मुख्य मुद्दे

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार. मात्र लडाख हा केंद्रशासित प्रदेशच राहणार, असं आश्वासन देताना नरेंद्र मोदींनी article 370 हटवल्यानंतर काश्मीरच्या विकासाचा मार्ग कसा मोकळा झालाय हे स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : काश्मीरमध्ये जगातलं सर्वांत मोठं पर्यटन केंद्र होण्याची क्षमता आहे. एके काळी इथे हिंदी सिनेमांचं चित्रीकरण व्हायचं. पण काही लोकांनी जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला. काश्मीरचा विकास होऊ दिला नाही. आता कलम 370 हटवल्यामुळे काश्मीर आणि लडाखमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना केल्या जातील. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये लवकरच नव्याने नोकर भरती होईल. 370 मुक्त काश्मीर, हेच सरदार पटेलांचं स्वप्न होतं. अटलबिहारी, पटेल आणि आंबेडकरांचं स्वप्न पुरं झालं, असं सांगत पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला.

पंतप्रधानांच्या भाषणातले हे आहेत 18 प्रमुख मुद्दे

1. काही लोकांनी केवळ काश्मिरी लोकांचा वापर करून घेतला

2. पाकिस्तानने फक्त लोकांना भडकवण्यासाठी कलम 370 चा शस्त्र म्हणून वापर केला.

3. कलम 370ने भ्रष्टाचार शिवाय काहीच नाही दिले.

4. कलम 370 काश्मीरच्या विकासात खोडा घालत होता. आमच्याआधी कोणी यासंबंधी चर्चाच केली नाही.

5. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार विधानसभेच्या निवडणुका. लडाख हा केंद्रशासित प्रदेशच राहणार.

6. सरकार सर्व कायदे हे देशाच्या भल्यासाठी करते. पण कायदे काश्मीरमध्ये लागू होत नसल्यामुळे तेथील  खुंटलेला विकास आता होणार.

7. काश्मीरमध्ये नवीन कार्य संस्कृती, पारदर्शकता वाढवण्याचं आम्ही काम करणार.

8. काश्मरीमधील कर्मचारी वर्गाला अन्य केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे मिळणार

9. काश्मीरमधील सफाई कर्मचारी, दलितांना त्यांचे हक्क मिळणार

10. 370 हटवल्यामुळे काश्मीर आणि लडाखमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना केल्या जातील.

11. काश्मीरमध्ये गुंतवणूक करा. बॉलिवूड आणि तेलगू सिनेसृष्टीला आवाहन

12. जम्मू-काश्मीरच्या जनतेचा प्रतिनिधी हा त्यांच्यातूनच निवडून येणार. पूर्वी प्रमाणेच आमदार, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ असणार.

13. 370 कलम रद्द केल्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागले.

14. काश्मीरमधून आता मोठे खेळाडू तयार होणार.

15. कलम 370 हटवण्याला विरोध करणाऱ्यांचाही आम्ही सन्मानच करतो.

16. केशराचा रंग असो वा कहावाचा स्वाद याचा प्रसार जगभर झाला पाहिजे.

17. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणाऱ्या लष्कर, निमलष्करी दलं आणि पोलिसांचे मी आभार मानतो. परिस्थिती हळूहळू निवळेल आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल.

18. ईदचा सण सुरळीत साजरा व्हावा, म्हणून सरकार सर्व मदत करणार तुम्हा सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 08:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading