VIDEO : शिवसेना-भाजप युती होणार का? मोदींच्या 'या' वक्तव्यात दडलंय उत्तर

VIDEO : शिवसेना-भाजप युती होणार का? मोदींच्या 'या' वक्तव्यात दडलंय उत्तर

सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती. मला जास्त काळजी आपल्या जवानांच्या जीवाची होती, असं पंतप्रधान मोदी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या घटक पक्षांबाबत सुचकं वक्तव्य केलं आहे. एनआयए वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीवर पहिल्यांदाच बोलले आहे. यावेळी त्यांनी प्रादेशिक पक्षांना टाळता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

"प्रत्येक प्रादशिक पक्षाची त्यांच्या पातळीवर एक ताकद असते. त्यामुळे आम्ही कधीच असा विचार करणार नाही की, त्यांची प्रगती झाली नाही पाहिजे. आम्ही कधी मोठं आहोत, असं सांगत नाही. काँग्रेसमध्ये असं होत नाही. काँग्रेसमध्ये जो पक्ष गेला, त्यांच्याशी भांडूनच बाहेर आला आहे. जेव्हा ते पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करतो, काँग्रेस  त्याचा बळी घेतो", अशा शब्दांनी मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

"जो ही पक्ष एनडीएला जोडला जातो, तो मोठा होतो. आमचा नेहमी प्रयत्न असतो, ते मोठे झाले पाहिजे. काही ठिकाणी त्यांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. काही पक्ष चर्चा करण्याचा मार्ग निवडतात. राजकीय पक्षांचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. परंतु, आमचा प्रयत्न असतो की, सर्वांना सोबत घेऊन पुढे चाललं पाहिजे.", असंही त्यांनी सांगितलं आहे.

तसंच "प्रादेशिक पक्षांना महत्त्व द्यावेच लागणार आहे आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे",असंही त्यांनी सांगितलं आहे.

पराभवाच्या कारणाचा शोध

"2018 हे आमच्यासाठी चांगलं वर्ष ठरलं. निवडणुका हा राजकारणातला फक्त एक छोटा भाग आहे. पाच राज्यातील विधानसभेच्या पराभवाचं कारण आम्ही शोधत आहोत. त्याचं चिंतन करणार आणि सुधारणाही करणार आहोत", असं मोदी म्हणाले.

 'राफेल'वर संसदेत चर्चेआधीच मोदी म्हणतात...

"सैन्याला दुर्बल करून माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. मला जितक्या शिव्या द्यायच्या त्या द्या, जे आरोप करायचे ते करा, पण जवानांना त्यांच्या नशिबावर सोडणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी निर्णय घेणारच,", असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राफेल करारवर स्पष्टीकरण दिलं आहे.

काँग्रेसने राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. अखेर आज त्यांनी यावर सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे. "हा माझ्यावर वैयक्तिगत आरोप नाही. जर माझ्यावर कुणी आरोप केला असेल तर का आणि कुणी केला याचा शोध केला पाहिजे. संसदेत राफेल करारबाबत मी विस्तृतपणे सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टानेही या राफेल कराराबाबत याचिकाच फेटाळून लावली आहे. फ्रान्सच्या पंतप्रधानांनीही याबद्दल खुलासा केला आहे. पण तरीही त्यांच्याकडून वारंवार आरोप होतं आहे. नुसतं दगड मारून ते पळून जात आहे. पण, त्यांनी जे आरोप केले आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवावे", असं आव्हानच मोदींनी राहुल गांधी यांना दिलं आहे.

"त्यांना आरोप करण्याचा रोग जडला आहे. मी आधीच राफेलबाबत उत्तर दिलं होतं. संसदेत याची माहिती दिली आहे. पण, तरीही यावर सारखं सारखं बोलून का वेळ वाया घालावयचा, हे मला पटत नाही",असं ते म्हणाले.

"भारताच्या सुरक्षेबाबत आतापर्यंत जे जे करार झाले त्यावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी असे आरोप करून सैन्याला दुर्बल केलं आहे. संरक्षण करारामध्ये दलालाचा का सहभाग करून घेतला?" असा सवालच त्यांनी विचारला.

"मेक इन इंडिया जर 70 वर्षांपूर्वी सुरू झाले असते तर आज देशात शस्त्रनिर्माण झाले असते. भारतने स्वत: चे शस्त्र तयार केले असते. माझा गुन्हा एवढाच आहे की, मी मेक इन इंडिया सुरू केलं. जवानाला गरजेचे शस्त्र मी आपल्या देशात तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे बाहेरचे दलालाचे दुकानं बंद होणार आहे. त्यामुळे माझ्यावर हे आरोप होत आहे. पण खोट्या आरोपांना घाबरून मी माघार घेणार नाही", असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसच्या कर्जमाफीवर पंतप्रधान मोदींचा घणाघात

काँग्रेसने अलीकडेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफीच्या प्रश्वावर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे."जनतेला खोटी माहिती द्यायची आणि फक्त आश्वासनं द्यायचं, म्हणून मी याला लाॅलिपाॅप म्हटलं होतं. काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा केली. पण, ती खोटी आहे. काँग्रेसने लोकांना संभ्रम केलं आहे. आम्ही 3 लाख कोटी रूपये देशात परत आणले आहे. पण काँग्रेसकडून नेहमी खोटा प्रचार केला गेला. हे चुकीचे आहे.", अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला.

"काँग्रेसने स्वामिनाथन आयोग आधीच लागू केला असता तर आज ही परिस्थिती आली नसती. शेतकरी कर्जबाजारी झाला नसता आणि त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती", अशीही टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, "याआधीही सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, तरीही शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे प्रत्येक निवडणुकींमध्ये कर्जमाफीचे आश्वासनं दिली जाते. कुठे तरी आता शेतकऱ्याचे हात भक्कम करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी बियाणे, सिंचन अशा अनेक योजना आणल्या आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे." असा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या 'चौकीदार चोर है'ला मोदींचं हे प्रत्युत्तर

नोटबंदीची खरंच गरज होती का? मोदी म्हणतात...

"नोटबंदी होण्याआधी काळ्या पैशाला देशात पाय फुटले होते. घरात लोकांनी काळा पैसा लपवून ठेवला होता. काळ्या पैशाने देशाला पोखरून काढले होते. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला", असा खुलासा पंतप्रधान मोदींनी केला.

"देशात काळा पैशाबाबत नेहमी बातम्या येत होत्या, त्यामुळे देशात एक अर्थव्यवस्था आणणे गरजेचं होतं. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेतला. येणाऱ्या काळात याचा मोठा फायदा होणार आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर आला. टॅक्स देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास वाढला आहे.", असा दावा त्यांनी केली.

नोटबंदी हा झटका होता का? असा सवाल विचारला असता मोदी म्हणाले की, "नोटबंदी हा झटका नाही. नोटबंदीच्या वर्षभरापुर्वी लोकांना काळा पैसा जमा करण्याचे आवाहन केले होते. काळा पैसा जमा केल्यावर दंड कमी लागेल अशीही योजना काढली होती. संसद, प्रसारमाध्यमातून ही आम्ही आव्हान केलं होतं. पण तरीही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय असाच घेतला नाही."

ते पुढे म्हणाले, "काळा पैशाला परत आणावे लागणार आहे. कर्जबुडवे या आधी पळून गेलेले देशात परत येत नव्हते. पहिल्यांदाच अशा लोकांना परत आणण्याचे प्रयत्न होत आहेत"

सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती

सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती. मला जास्त काळजी आपल्या जवानांच्या जीवाची होती, असं पंतप्रधान मोदी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"सर्जिकल स्ट्राईक करणं ही मोठी जोखीम होती. पण मला राजकीय जोखमीची चिंता नसते. जवानांच्या जीवाची मला जास्त काळजी होती", असं पंतप्रधानांनी सांगितलं. मोदींना रात्रभऱ सर्जिकल स्ट्राईकचे LIVE अपडेट्स मिळत होते, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. "आपले जवान सीमेपलीकडे असताना एक तास काहीच अपडेट्स मिळत नव्हते, तेव्हा चलबिचल वाढली होती", असंही त्यांनी सांगितलं.

"एका लढाईने पाकिस्तानला धडा मिळणार नाही. पाकिस्तानला सुधारण्यासाठी खूप वेळ लागेल", असंही मोदी यावेळी म्हणाले होते.

================

First published: January 1, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading