S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अभिनंदन शब्दाचा अर्थच आता बदलला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अभिनंदन हे जवळपास तीन दिवस पाकिस्तानच्या कैदेत होते. त्यांच्या सुखरुप वापसीचा देशभरात जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

Updated On: Mar 2, 2019 12:53 PM IST

अभिनंदन शब्दाचा अर्थच आता बदलला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 02 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान अखेर शुक्रवारी(1 मार्च)रात्री भारतात परतले आहेत. अभिनंदन हे जवळपास तीन दिवस पाकिस्तानच्या कैदेत होते. त्यांच्या सुखरुप वापसीचा देशभरात जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी शनिवारी (2 मार्च) एका कार्यक्रमादरम्यान अभिनंदन यांच्या धाडसाचे जाहीर कौतुक केले.

अभिनंदनचा अर्थ आता बदलला आहे - पंतप्रधान मोदी

'भारत देश जे काही करतो, त्याकडे जग गांभीर्यानं पाहत असतं. शब्दकोशातील शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद या देशात आहे. कधी काळी 'अभिनंदन' या शब्दाचा अर्थ 'Congratulation' असा होता, मात्र आता 'अभिनंदन'चा अर्थ बदलला आहे', अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.




F16 क्रॅशनंतर पाक वैमानिक त्यांच्याच जमिनीवर उतरला, जमावाने भारतीय समजून घेतला जीव

अभिनंदन यांचा अभिमान

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान  शुक्रवारी (2 मार्च) देशात परतले. शुक्रवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला. यापूर्वी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांच्या भारतवापसीमध्ये दिरंगाई केली होती.

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (2 मार्च)भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

एअर स्ट्राईकवरून पुन्हा दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

नेमकी काय आहे घटना?

- पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

- पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

- पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

- त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

- पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

- पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

- संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

- नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

- आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान यांना सोडाव लागलं.


VIDEO: तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवते, शहीद निनाद यांची पत्नी...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close