VIDEO दाऊद इब्राहिमवर कारवाई करणार का? असं विचारल्यावर मोदींनी दिलं हे उत्तर

VIDEO दाऊद इब्राहिमवर कारवाई करणार का? असं विचारल्यावर मोदींनी दिलं हे उत्तर

तुम्ही सत्तेवर पुन्हा आलात तर हाफीझ सईद किंवा दाऊद इब्राहिमसारख्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले....

  • Share this:

रोहतक (हरयाणा), 10 मे : तुम्ही सत्तेवर पुन्हा आलात तर हाफीझ सईद किंवा दाऊद इब्राहिमसारख्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्ही अशी निवडक नावं घेऊन आपला वेळ घालवू नका, भारताला ज्या ज्या व्यक्तींकडून, व्यवस्थेकडून धोका असेल त्यांच्यापासून देशाचं रक्षण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.

हरियाणाच्या रोहतकमध्ये ANI शी बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं. प्रचारानंतर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी सॅम पित्रोडांचं वक्तव्य, राजीव गांधी यांचं धोरण याविषयी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली.

जळी-स्थळी किंवा हवेतून, अवकाशातूनही धोका निर्माण झाला, तरी आम्ही देशाचं संरक्षण करू, असं ते म्हणाले.

First published: May 10, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading