मराठी बातम्या /बातम्या /देश /PM Modi यांच्या ताफ्यात 12 कोटींची नवी कोरी मर्सिडीज! बॉम्ब हल्ल्यापासूनही आहे सुरक्षित; पाहा एकापेक्षा एक फीचर्स

PM Modi यांच्या ताफ्यात 12 कोटींची नवी कोरी मर्सिडीज! बॉम्ब हल्ल्यापासूनही आहे सुरक्षित; पाहा एकापेक्षा एक फीचर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीतील हैदराबाद हाउस (PM Modi at Hyderabad House) येथे रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान आपल्या नेहमीच्या गाडीमध्ये न दिसता, नव्या कोऱ्या मर्सिडीजमध्ये दिसले. कोणती आहे ही कार आणि काय आहेत या गाडीचे फीचर्स, जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीतील हैदराबाद हाउस (PM Modi at Hyderabad House) येथे रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान आपल्या नेहमीच्या गाडीमध्ये न दिसता, नव्या कोऱ्या मर्सिडीजमध्ये दिसले. कोणती आहे ही कार आणि काय आहेत या गाडीचे फीचर्स, जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीतील हैदराबाद हाउस (PM Modi at Hyderabad House) येथे रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान आपल्या नेहमीच्या गाडीमध्ये न दिसता, नव्या कोऱ्या मर्सिडीजमध्ये दिसले. कोणती आहे ही कार आणि काय आहेत या गाडीचे फीचर्स, जाणून घ्या

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 28 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीतील हैदराबाद हाउस (PM Modi at Hyderabad House) येथे रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान आपल्या नेहमीच्या गाडीमध्ये न दिसता, नव्या कोऱ्या मर्सिडीजमध्ये दिसून (PM Modi Mercedes) आले. यापूर्वी पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये रेंज रोव्हर व्होग (Range Rover Vogue) आणि टोयोटा लँड क्रूझर (Toyota Land cruiser) या गाड्या होत्या. आता त्यामध्ये मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड (Mercedes-Maybach S650 Guard) ही आर्मर्ड कार दाखल झाली आहे. काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये? जाणून घेऊयात!

    सर्वात सुरक्षित आहे गाडी

    मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड या गाडीला व्हीआर10 दर्जाची (VR10 level protection) सुरक्षितता देण्यात आली आहे. मर्सिडीजची ही सर्वांत सुरक्षित (highest protected production car) गाडी मानली जाते. या गाडीची किंमत ही 12 कोटी रुपयांहून अधिक (Mercedes-Maybach S650 Guard price) असल्याचे सांगण्यात येत आहे. मर्सिडीजने गेल्या वर्षी भारतात मेबॅक S600 गार्ड हे मॉडेल लाँच केलं होतं, ज्याची किंमत 10.5 कोटी रुपये होती. अर्थात, ही गाडी पंतप्रधानांसाठी मागवण्यात आली असल्यामुळे, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वांत लेटेस्ट मॉडेल मागवण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे.

    हे वाचा-84वा वाढदिवस साजरा करतायंत रतन टाटा, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

    पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, म्हणजेच एसपीजीकडे (SPG) असते. एसपीजी वेळोवेळी सुरक्षा उपायांचा आढावा घेऊन, पंतप्रधानांना नव्या – अधिक सुरक्षित गाडीची गरज असल्याची खात्री करून, त्यानुसार गाड्या मागवून घेते. 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्यासाठी बीएमडब्ल्यू 7 सीरीज हाय-रिक्युरिटी एडिशन (PM Modi first Car) ही गाडी वापरण्यात येत होती.

    ही गाडी पूर्णपणे बुलेटप्रूफ (Mercedes-Maybach S650 Guard features) आहे. या गाडीच्या काचा आणि बॉडी अगदी स्टील कोअर बुलेट्सचा माराही झेलू शकतात. या गाडीला 2010 एक्सप्लोझिव्ह प्रूफ व्हेईकल (ERV) दर्जा मिळाला आहे. याचा अर्थ, गाडीपासून अवघ्या दोन मीटर अंतरावर जरी 15 किलो टीएनटी स्फोट झाला, तरी गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला कसलीही इजा (Safe from TNT Blast) होणार नाही. गाडीच्या काचांचा आतील भाग हा पॉलिकार्बोनेट कोटिंगचा आहे. तसंच, गाडीला खालच्या बाजूनेही भरभक्कम असं सुरक्षा कवच (lower part heavily armoured) देण्यात आलं आहे. केवळ बॉम्ब आणि गोळीबारच नाही, तर गॅस अटॅक झाला तरीही गाडीच्या आतील व्यक्ती सुरक्षित राहू शकते. यासाठी गाडीच्या आतमध्ये वेगळ्या अशा एअर सप्लाय सिस्टीमची (Separate Air supply system) सुविधा देण्यात आली आहे.

    हे वाचा-पहिल्या 'राष्ट्रीय ग्रेपलिंग रेसलिंग' स्पर्धेत नाशिकच्या बहिणींनी गाजवलं मैदान

    मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड या गाडीला अगदी परिपूर्ण सुरक्षित गाडी बनवण्यापासून कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नाही. या गाडीचा फ्युअल टँक अशा प्रकारे बनवण्यात आला आहे, की गाडीवर हल्ला झाल्यानंतर क्षणार्धात तो आपोआप बंद होऊन जातो. यासाठी बोईंगच्या एएच-64 अपाचे टँक हेलिकॉप्टर्स साठी वापरण्यात येणाऱ्या विशेष मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. तसेच या गाडीचे टायर्सही स्पेशल रन-फ्लॅट प्रकारचे (Special Run-flat tires) आहेत. या चाकांना अगदी बंदुकीच्या गोळ्या लागल्यानंतरही ते नेहमीप्रमाणेच काम करतात.

    मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड या कारला 6.0 लिटर ट्विन टर्बो व्ही12 इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनची क्षमता 516bhp आहे, तसेच यातून सुमारे 900Nm एवढा टॉर्क जनरेट करता येतो. या गाडीचा सर्वोच्च वेग हा 160 किलोमीटर प्रतितास (Mercedes-Maybach S650 Guard top speed) एवढा आहे. गाडीच्या आतील भाग अगदी लग्झरिअस आहे. मागील भागात बसणाऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात लेग रूम आणि सीट मसाजर अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिनी ही कार घेणं महत्त्वाचं होतं आणि एसपीजींनी ते काम केलं आहे त्यामुळे पंतप्रधानांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.

    First published:
    top videos