नवी दिल्ली, 29 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने 'मिशन शक्ती'च्या यशाचे संबोधनातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे सांगत क्लीन चिट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणासंदर्भात निवडणूक आयोगने हा निर्णय दिला.
भारताच्या मिशन शक्तीच्या यशाची माहिती देण्यासाठी मोदी यांनी 27 मार्च रोजी संवाद साधला होता. मोदींनी आचार संहितेचे उल्लंघन केले नाही ना यासंदर्भात आयोगाकडून चौकशी केली. यासंदर्भात आयोगाने एका समितीची नियुक्ती केली होती. तसेच दुरदर्शन आणि आकाशवाणीकडून संबंधित भाषणाचे फीड आणि माहिती मागवण्यात आले होते.
वाचा : 'मिशन शक्ती'ला परवानगी नक्की कुणी दिली? सरकारने केला खुलासा
मोदींच्या भाषणासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी उप निवडणूक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. ही समितीने मोदींच्या भाषणाची तपासणी केली. विरोधी पक्षांच्या मते मोदींनी त्यांच्या भाषणात सरकारच्या कामाचा उल्लेख केला. त्यांच्या भाषणात राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही गोष्ट नव्हती.
VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..