मराठी बातम्या /बातम्या /देश /

परमीवर चक्र विजेत्यांच्या सन्मान, अंदमानवरील 21 बेटांना मिळालं नवं नाव!

परमीवर चक्र विजेत्यांच्या सन्मान, अंदमानवरील 21 बेटांना मिळालं नवं नाव!

पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांवरील 21 सर्वात मोठ्या अनामिक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत.

पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांवरील 21 सर्वात मोठ्या अनामिक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत.

पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांवरील 21 सर्वात मोठ्या अनामिक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी : पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांवरील 21 सर्वात मोठ्या अनामिक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत. या निमित्तानं झालेल्या विशेष व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.  सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अंदमानमधील त्यांच्या स्मारकाच्या मॉडेलचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं.

अंदमान आणि निकोबार बेटांच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी, पंतप्रधानांनी 2018 मध्ये बेटाला दिलेल्या भेटीदरम्यान रॉस बेटाचं नाव बदलून 'नेताजी सुभाषचंद्र बोस द्विप' असं ठेवलं होतं. नील बेट आणि हॅवलॉक बेटांचंही नामकरण 'शहीद द्वीप' आणि 'स्वराज द्वीप' असं करण्यात आलं होतं.

आपल्या वीरांना श्रद्धांजली

"देशातील वास्तविक हिरोंना योग्य आदर देण्याला पंतप्रधानांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. याच भावनेतून आता अंदमान आणि निकोबार बेट समूहातील 21 सर्वांत मोठ्या अनामिक बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्या योद्ध्यांची नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे". सर्वांत मोठ्या अनामिक बेटाला पहिल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्याचं नाव देण्यात आलं आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या बेटाला दुसऱ्या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्याचं नाव दिलं जाईल.

"आपल्या वीरांना चिरस्थायी स्वरूपातील श्रद्धांजली देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या पैकी काही वीरांनी राष्ट्राचं सार्वभौमत्व आणि अखंडतेचं रक्षण करण्यासाठी बलिदान दिलं होतं," असंही पीएमओनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Subhash Chandra Bose Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रसिद्ध घोषवाक्य..

या बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करमसिंग, एमएम, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग, कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदरसिंग, मेजर शैतानसिंग, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद; लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियारसिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजितसिंग सेखों, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बानासिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमन) संजय कुमार, आणि सुभेदार मेजर सेवानिवृत्त (होनी कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, अशी ही 21नावं आहेत. यापैकी काहींनी देशासाठी सर्वोच्च बलिदान देऊन सीमांचं रक्षण केलं तर काही परमवीर चक्र विजेते सैन्यदलातून निवृत्त झाले आणि हयात आहेत.

नेताजी स्मारक

नेताजींच्या प्रस्तावित स्मारकाचं मॉडेल रॉस बेटावर उभारलं जाईल. 2018 मध्ये या बेटाचं नामकरण नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असं करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्मारकामध्ये एक संग्रहालय, केबल कार रोप-वे, लेझर-अँड-साउंड शो, ऐतिहासिक इमारतींमधून जाणारा हेरिटेज ट्रेल, थीमवर-आधारित मुलांचा अ‍ॅम्युझमेंट पार्क आणि एक रेस्ट्रो लाऊंज याचा समावेश आहे.

अमित शहा यांचा दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या दोन दिवसांच्या भेटीसाठी रविवारी रात्री पोर्ट ब्लेअर येथे पोहोचले आहेत. जिथे ते विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शाह आज दिवसभरात राष्ट्रध्वज फडकावतील आणि नेताजी स्टेडियमवर जाहीर भाषण देतील. याच ठिकाणी नेताजींनी 30 डिसेंबर 1943 रोजी तिरंगा फडकवला होता. पूर्वी हे स्टेडियम जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जात होतं. शाह बेटांवरील सेल्युलर जेललाही भेट देतील अशी शक्यता आहे.

First published:

Tags: PM Narendra Modi