अहमदाबाद, 11 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री (PM Modi mother takes corona vaccine) हिराबेन मोदी यांनी आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. स्वतः मोदींनीच ही बातमी सोशल मीडियातून दिली. "माझ्या आईने लस घेतली. तुम्हीही तुमच्या आप्तांना लस घेण्यास प्रवृत्त करा", अशा अर्थाचं Tweet पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडवरून केलं आहे.
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वय आता 100 च्या जवळ पोहोचलं आहे. 70 वर्षांच्या मोदींनी स्वतः 1 मार्चलाच लस घेतली होती. त्यांनी भारतीय बनावटीची Covaxin (Bharat Biotech covaxin) ही लस घेतली होती.
देशभरातील कोरोना (Coronavirus In India) पेशंट्सची संख्या रोज वाढत आहे.त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग देखील वाढवला आहे. आता लवकरच लसीकरणाचा पुढील टप्पा सुरु होणार आहे. त्यात 50 वर्षांपुढच्या नागरिकांचं लसीकरण होणार आहे.
सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी, डॉक्टर आणि कोविड फ्रंटलायनर्सना (Covid Frontliners) कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर फील्डवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचंही लसीकरण झालं. आता सध्या सुरू असलेल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. 60 वर्षांपुढील नागरिक आणि 45 वर्षांपुढचे असे नागरिक ज्यांना इतर कुठली व्याधी आहे (comorbid)अशांचं लसीकरण सध्या सुरू आहे. यापुढच्या टप्प्यात 50 वयानंतरच्या कुठल्याही व्यक्तीला लस घेता येईल.
Happy to share that my mother has taken the first dose of the COVID-19 vaccine today. I urge everyone to help and motivate people around you who are eligible to take the vaccine.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2021
देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. या सर्वांचे एकाच टप्प्यात लसीकरण शक्य नाही. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला कोरोना पेशंट्सच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली. आता सामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सर्व नागरिकांचे त्यांच्या वयानुसार गट पाडण्यात आले आहेत.
मोदींनी 11 मार्चला केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, "मला सांगण्यास आनंद होतो की, माझ्या आईने आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. तुम्हीसुद्धा तुमच्या आसपास लस घेण्यास योग्य व्यक्ती असतील तर त्यांना कोरोना लस घेण्याविषयी प्रवृत्त करा."
मुख्यमंत्री ठाकरेंनीही घेतली लस
11 मार्चच्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) मुख्यमंत्री ठाकरे यांची पत्नी रश्मी यांनीही लस घेतली आहे.
मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Covid19, India, Narendra modi, Social media viral, Twitter