S M L

...आणि म्हणून ते थेट गळ्यात पडले - मोदी

'आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की अविश्वास प्रस्ताव आणण्याचे नेमके कारण काय आहे. जरा सांगाल का, पण ते कारण सांगू शकले नाहीत आणि मग थेट गळ्यात पडले,' हे उद्गार आहेत पंतप्रधान मोदींचे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2018 03:46 PM IST

...आणि म्हणून ते थेट गळ्यात पडले - मोदी

शाहजानपूर, 21 जुलै : 'आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की अविश्वास प्रस्ताव आणण्याचे नेमके कारण काय आहे. जरा सांगाल का, पण ते कारण सांगू शकले नाहीत आणि मग थेट गळ्यात पडले,' हे उद्गार आहेत पंतप्रधान मोदींचे. उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते सांगत होते. शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती.

शहाजानपूर या ठिकाणी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही टीका केली. इतकेच नाही तर राहुल गांधी यांना बाकी काहीही दिसत नसले तरीही पंतप्रधानांची खुर्ची मात्र दिसते आहे असेही त्यांनी म्हटले.

अविश्वास ठरावाच्या वेळी केलेल्या भाषणातही मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा समाचार घेतलाय. ज्यांना माझ्या जागेवर बसायची घाई झालीये ते आज इथे येऊन मला उठा उठा म्हणत होते. पण इथं बसवणं उठवण केवळ 125 कोटी जनतेच्या हाती हे त्यांनी लक्षात ठेवावं असं म्हणत गळाभेट घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोचक टोला लगावला. तसंच आम्ही तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू शकत नाही, कारण तुमच्या डोळ्यात डोळे घालून आजपर्यंत तुमच्या नेत्यांसोबत काय केलं ?, असा खोचक टोलाही मोदींना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 03:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close