'हिन्दुस्तान जिंदाबाद था, है और रहेगा'; PM मोदींच्या ट्विटची चर्चा

'हिन्दुस्तान जिंदाबाद था, है और रहेगा'; PM मोदींच्या ट्विटची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल: काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेता सनी देओल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सनी देओल यांना गुरुदासपुर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मोदींसोबतच्या भेटीत सनी देओल यांना काही राजकीय सल्ला देखील मिळाला असेल यात शंका नाही. पण या भेटीनंतर मोदींनी केलेल्या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.

मोदींनी देओल यांना भेटल्यानंतर त्यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत 'हम दोनों का मानना है कि हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!', असे लिहले आहे. सनी देओल यांच्याबाबत मला सर्वात प्रभावी करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या असलेली विनम्रता आणि भारताला सर्वोत्तम करण्यासाठीची त्यांची पॅशन होय. असे मोदींनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच दिवशी त्यांना गुरुदासपूर येथून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मोदींना भेटण्याआधी शनिवारी सनी देओल यांनी पक्षाच्या बाडमेर येथील रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या रोड शो दरम्यान देओल यांनी अभिनय केलेल्या गदर आणि दामिनी सारख्या चित्रपटाचे डायलॉग लावले होते. तेव्हा समर्थक 'हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा', अशा घोषणा देत होते.

गुरुदासपूर ही लोकसभेची हायप्रोफाईल जागा आहे. 2014मध्ये विनोद खन्ना यांनी येथून विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. या मतदारसंघातून सनी देओल यांनी विजय मिळावा अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

VIDEO : 'मीच माफी मागतो', राहुल गांधींना 'असा' सोडवला सुरक्षारक्षक-पायलटमध्ये झालेला वाद

First published: April 28, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading