नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनाबाधित रुग्णांची भारतातील संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात लॉकडाऊन केल्यानंतरही अशी स्थिती निर्माण झाल्याने चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील एका डॉक्टरला प्रश्न विचारून स्थिती जाणून घेतली.
'तुम्ही जनसेवेच्या दृष्टीकोनातून या कामात उतरला आहेत. त्यामुळे तुम्ही देशाला काय संदेश द्याल? कारण लोकांच्याही मनात प्रश्न आहे की कधी डॉक्टरकडे जायचं, कधी तपासणी करायची? याबाबत काय सांगाल?' असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील डॉक्टर बोरसले यांना विचारला. त्यावर डॉक्टर बोरसे म्हणाले की, 'पुण्यात जानेवारीपासून कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 16 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. यातील 7 जणांना आपण उपचार करून आता डिस्चार्जही दिला आहे.'
पुढे बोलताना डॉक्टर बोरसे म्हणाले की, 'बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांना आपण घरी सोडलं असलं तरीही त्यांना होम क्वारन्टाइनच्या सूचना दिल्या आहेत. तसंच योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं आहे. हा आजार इतकाही घातक नाही. त्यामुळे इतरही रुग्ण आता उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. कोरोनाविरोधातील लढाई आपण नक्कीच जिंकू.'
भारत में ऐसी स्थिति न आये इसके लिए ही हमें निरंतर प्रयास करना है | एक और डाक्टर हमारे साथ पुणे से जुड़ रहे हैं... श्रीमान डाक्टर बोरसे#PMonAIR #MannKiBaatpic.twitter.com/jMdXjHSzSO
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) March 29, 2020
नरेंद्र मोदींनी मागितली माफी
कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊनंतर जनतेला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये जनतेची माफी मागितली आहे.
'कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. लॉकडाऊन करणं गरजेचं होतं अन्य़था कोरोना संसर्ग वेगानं पसरला असता,' असं नरेंद्र मोदी म्हणाले.