मुंबई, 31 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) मन की बात 2.0 या रेडिओ कार्यक्रमातून बोलत आहेत. पंतप्रधान दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बातमधून देशाला संबोधित करतात.सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबवण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करीत आहेत. पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात सांगितलं की, अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग देशात ढासळला. अशा परिस्थितीत कोणतीही शिथिलता कायम ठेवली जाऊ नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेसोबत मन की बातमधून संवाद साधला आहे. याआधी संवाद साधताना चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. आता अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग Unlock 1.0 मध्ये सुरू होत आहे. त्यामुळे सर्वात जास्त सतर्क राहाणं आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसोबत केंद्र सरकारनं ज्या गाईडलाईन दिल्या आहेत त्याचं पालन करणं आपल्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे
- माझ्या मनाला स्पर्श करणारी आणखी एक गोष्ट ही की, संकटाच्या या काळात सर्व देशवासीय, खेड्यांपासून शहरं, आमच्या छोट्या व्यापाऱ्यांपासून ते स्टार्टअपपर्यंत, आपल्या लॅबमध्ये कोरोनाविरूद्धच्या लढाईत नवीन मार्ग शोधून काढले जात आहेत.
- नाशिकचे राजेंद्र यादव यांचं उदाहरण खूप रंजक आहे. राजेंद्र हे नाशिकमधील सतना गावचे शेतकरी आहेत. आपल्या गावाला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी, त्यांनी ट्रॅक्टरला जोडून स्वच्छता यंत्र बनवलं आहे आणि ही मशीन अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे.
-इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाला रोखण्यात पुढे आहे
-देशात एकजुटीने कोरोना विरोधात लढा सुरू आहे
-संकटाच्या काळात झालेल्या संशोधनाचं मोदींकडून कौतुक
-देशाच्या सामूहित शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश
- याशिवाय स्वदेशी वस्तुंना उद्योगांना चालना मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. लॉकडाउनचा चौथा टप्पा सध्या कार्यरत आहे, जो 31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. मोदींची ही 65 वा 'मन की बात' आहे. पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवर 'मन की बात' कार्यक्रम करतात. या माध्यमातून पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या विषयांवर लोकांना संबोधित करतात.
मागील 'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी कोरोनाबाबत अति-आत्मविश्वास टाळायला सांगितलं होतं. देशातील जनता भारतातील कोरोना विषाणूविरूद्ध लढत आहे. व्यवसाय असो, ऑफिस कल्चर, शिक्षण असो की वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण कोरोना व्हायरस साथीच्या बदलांना सामोरं जात आहे. संपूर्ण जगाचा अनुभव आपल्याला खूप काही शिकवत आहे, म्हणून आपण अति आत्मविश्वास बाळगू नये असं मोदी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pm modi, Pm modi speech, PM narendra modi