• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • PM Narendra Modi LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधणार

PM Narendra Modi LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधणार

PM Narendra Modi

PM Narendra Modi

PM Narendra Modi LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. पण उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी ते देशाला संबोधित करणार आहेत. पीएमओनं या संदर्भातलं ट्विट केलं आहे. आज गुरुनानक जयंती आहे.  दीपोत्सव आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  उत्तर प्रदेशातील महोबा येथे सिंचन प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ते झाशीतील राष्ट्र रक्षा समर्पण पर्व कार्यक्रमात सहभागी होतील. रवाना होण्यापूर्वी ते सकाळी 9 वाजता देशाला संदेश देतील, असं ट्विट PMO नं केलं आहे. दोन दिवसांपूर्वी पीएम मोदी राज्याच्या पूर्वांचलच्या दौऱ्यावर होते आणि तेथे त्यांनी अनेक विकास योजनांचे उद्घाटन केलं. तसंच नवीन योजनांची पायाभरणी केली. दरम्यान आज पीएम मोदी बुंदेलखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी झाशी आणि महोबामध्ये मोठ्या योजना सुरू करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक योजना आणि प्रकल्प सुरू करणार आहेत. त्यानंतर मोदी लखनऊला जातील आणि दिल्लीला परतण्यापूर्वी शनिवारी आणि रविवारी डीजीपींच्या परिषदेत सहभागी होतील. हेही वाचा- IIT बॉम्बेनं केलं Alert! तुमच्या घरातच आहे Corona चा 10 पट जास्त धोका तसंच मोदींच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.  राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त 'झाशी जलसा महोत्सवा'च्या समारोपासाठी पंतप्रधान झाशीत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या झाशी नोड येथे भारत डायनामिक्सच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि मेगा सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करतील.
  Published by:Pooja Vichare
  First published: