PM Narendra Modi Live Speech on Coronavirus: 22 मार्चला असणार जनता कर्फ्यू

PM Narendra Modi Live Speech on Coronavirus: 22 मार्चला असणार जनता कर्फ्यू

PM Narendra Modi Speech Live on Coronavirus, Written Updates / पीएम नरेंद्र मोदी लाईव्ह भाषण : पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूमुळे ओढावलेली परिस्थिती आणि या आजाराला सामोरं जाण्यासाठी सरकारने उचललेली पाऊलं यावर माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : संपूर्ण जगावर खूप मोठं संकट आलं असून यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांना नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याच्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून दिल्या आहेत. रविवारी 22 मार्चला कोणीही घराबाहेर पडू नका संचारबंदी लागू करण्यात येणार असून सगळ्यांनी त्यांचं पालन करावं असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे. पण या सगळ्यात कुठेही अन्यधान्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी ग्वाहीदेखील मोदींकडून देण्यात आली आहे.

मला तुमचे काही आठवडे हवे आहेत आणि तुमचा वेळ हवा आहे. कोरोनावर निश्चित उपाय सापडलेला नाही. त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. पण यावर भारतीय शास्त्रज्ञ काम करत आहे असं नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- आपण निरोगी राहिलो तर जग निरोगी राहिल

- कोरोनाचा सामना करण्यासाठी संयम ठेवणं महत्त्वाचं आहे

- गर्दीपासून साावध रहा, घराच्या बाहेर निघू नका

- जितकं शक्य आहे तितकं घरी राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढी कामं घरातून करण्याचा प्रयत्न करा

- सरकारी कर्मचारी, रुग्णालयं आणि पत्रकारांना काम करणं महत्त्वाचं आहे. पण इतरांनी स्वत:ला आयसोलेटेड करणं महत्त्वाचं आहे

- वयोवृद्धांनी पुढचे काही दिवस घराच्या बाहेर पाऊल टाकू नका

- 22 मार्चला संचारबंदी लागू करण्यात येईल, त्याचं सगळेजण पालन करूया

- जनतेनं जनतेसाठी संचारबंदी करा

- सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नका

- जनता कर्फ्यूचा संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा

- ही कसोटी कोरोनाविरुद्ध चाचणी आहे

- रविवारी आपण आपल्या दरवाजासमोर उभं राहून संध्याकाळी 5 वाजता अशा लोकांचे आभार व्यक्त करा ज्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.

- 22 मार्चला सगळ्यांचे कृतज्ञतेने आभार माना

- रुटीन चेकअपसाठीसुद्धा घराच्या बाहेर पडू नका. शक्य असेल तर डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घ्या

- या महामारीमुळे देशातील सर्वसामान्यांवर आर्थिक अडचण आहे.

- मोठ्या वर्गातील लोकांना निवदेन आहे की तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करा.

- जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा पडणार नाही. अन्यधान्य कमी पडणार नाही

यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूमुळे ओढावलेली परिस्थिती आणि या आजाराला सामोरं जाण्यासाठी सरकारने उचललेली पाऊलं यावर माहिती दिली आहे. तसंच आपण कोरोनाचा सामना कसा केला पाहिजे याबद्दलही मोदींनी नागरिकांना मार्गदर्श केलं आहे.

देशात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारने महत्त्वाच्या काही सचूना जाहीर केल्या आहे. राज्यातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारनं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

COVID19 संदर्भात नवीन सूचना जाहीर

- 22 मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान भारतात येण्यास परवानगी नाही.

- राज्य सरकारने अधिसूचना काढून 65 वर्षांवरील व्यक्तींना घराबाहेर (वैद्यकीय कामाव्यतिरिक्त) पडू नये, असा सल्ला द्यावा.

- त्याचप्रमाणे 10 वर्षाखालील मुलामुलींना घराबाहेर पडू देऊ नये.

- रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्या, (अपवाद: विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग)

- राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला घरुन काम करण्याची मूभा द्यावी.

- गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याआड व वेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना.

दरम्यान, फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे.दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

First published: March 19, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या