Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलणार, मोठ्या घोषणेची शक्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलणार, मोठ्या घोषणेची शक्यता!

लस आली तर ती देशभर कशी पोहोचवायची याचा आराखडाही केंद्र सरकारने तयार केला आहे.

लस आली तर ती देशभर कशी पोहोचवायची याचा आराखडाही केंद्र सरकारने तयार केला आहे.

अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता आता पुन्हा व्यापक लॉकडाऊन करण्यात येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

  नवी दिल्ली 24 जुलै: लॉकडाऊन नंतर आता देशात Unlockची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचे दोन टप्पे झाले असून आता तिसऱ्या टप्प्याचा (Unlock 3) विचार सुरू आहे. त्यातच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशातल्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलणार आहेत. येत्या सोमवारी (27 जुलै) ते सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मोठ्या घोषणेची शक्यताही व्यक्त केली जात आहे. देशात Unlockची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्थचक्र पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. पण अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता आता पुन्हा व्यापक लॉकडाऊन करण्यात येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. आता यापुढे कसं जायचं. राज्यांना काय समस्या आहेत ते पंतप्रधान ऐकून घेणार असून पुढची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान, राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची भर पडली. गेल्या 24 तासांत 9615 रुग्ण सापडले आहेत. तर  278 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचीं संख्या 3,51,117 वर गेली आहे. तर Active रुग्णांचा आकडा 1,43, 714 एवढा झाला आहे. तर 5714 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातल्या मृत्यूची एकूण संख्या ही 13 हजार 132 एवढी झाली आहे. मुंबईत आज 1057 नवे रुग्ण सापडले. तर 54 जणांचा मृत्यू झाला. सुशांतचा शेवटचा चित्रपट Dil Bechara रिलीज; मनाला चटका लावणारी मॅनीची एक्झिट आज ठाणे महापालिका क्षेत्रात 285 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 17150 झाली आहे. भारताने तयार केलेली कोरोना लस (CORONA VACCINE) कोवॅक्सिनची (COVAXIN) मानवी चाचणी (HUMAN TRIAL) सुरू झाली आहे. देशभरातील 12 संस्थांमध्ये या लशीच्या ह्युमन ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीतील एम्समध्ये (DELHI AIIMS) आजपासून या लशीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिली लस 30 वर्षांच्या व्यक्तीला देण्यात आली आहे आणि या लशीचा काय परिणाम झाला याबाबत महत्त्वपूर्ण माहिती एम्सने दिली आहे. एका क्षणात वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू, पुलाच्या पाण्यात मोटारसायकल वाहिली आणि.. एम्समधील या ह्युमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी एएनआयला माहिती देताना सांगितलं, "दिल्लीतल्या 30 वर्षीय व्यक्तीला आम्ही कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला. कोरोनाची लस घेणारी ही पहिली व्यक्ती आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची आरोग्य तपासणी झाली आणि तो पूर्णपणे निरोगी आहे, त्याला कोणतीही समस्या किंवा आजार नाही. "लस दिल्यानंतर त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही"
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Narendra modi

  पुढील बातम्या