Home /News /national /

तब्बल 57 दिवसांनी दिल्लीबाहेर पडले पंतप्रधान मोदी, करणार 'या' भागांचा दौरा

तब्बल 57 दिवसांनी दिल्लीबाहेर पडले पंतप्रधान मोदी, करणार 'या' भागांचा दौरा

लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि चित्रकूट येथे 83 दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी अखेरचा दौरा केला होता.

    नवी दिल्ली, 22 मे : ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश केल्यानंतर सुपर चक्रीवादळ 'अम्फान' (Super Cyclone Amphan) बांगलादेशच्या दिशेनं गेले. बंगालमध्ये (West Bengal) अम्फानमुळे72 लोकांचा मृत्यू झाला तर दोन जिल्हे पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. ओडिशामध्येही बरेच नुकसान झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रवाती वादळ अम्फानमुळे प्रभावित भागांचा दौरा करतील. पीएम मोदी दिल्लीहून कोलकाताला रवाना झाले आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल 57 दिवसांनी मोदी दिल्लीतून बाहेर पडणार आहेत. तब्बल 59 दिवस लोकं घरांमध्ये कैद आहेत. दरम्यान, पंतप्रधान दिल्लीत मुक्काम करतात. या दिवसांत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी देशातील आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये भाग घेतला. आज पहिल्यांदाच मोदी दिल्लीबाहेर पडले. लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि चित्रकूट येथे 83 दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी अखेरचा दौरा केला होता. चक्रीवादळ बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलामधील हटिया बेटच्या किनाऱ्यावर पोहोचलं. चक्रीवादळानं किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात कहर माजवला. वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीजेचे खांब रस्त्यांवर पडले तर घर आणि अनेक इमारतींची छप्पर उडून गेली आहेत. या चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगालमध्ये बसला आहे. हे नुकसानं एवढं मोठं आहे की शब्दात व्यक्त करता येणार नाही. साधारण 1 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे पण नेमकं किती नुकसान झालं हे कळायला काही दिवस लागतील असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cyclone, Narendra modi

    पुढील बातम्या