श्रीनगर, 04 नोव्हेंबर: देशभरात आज दिवाळी (Diwali 2021)सण साजरा केला जात आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) नौशेरा सेक्टरमध्ये(Nowshera Sector) जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झाले आहेत. तेथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जवानांची भेट घेतली. यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी, नौशेराला रवाना होण्यापूर्वी दिल्लीत पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा फारशी सुरक्षा नसताना सर्वसामान्यांसारखा निघाला. यावेळी मोदींचा ताफा दिल्लीतील ट्रॅफिक सिग्नलवर देखील थांबला.
दिल्लीहून नौशेराकडे रवाना होत असताना पीएम मोदींच्या गाड्यांचा ताफा सर्वसामान्यांप्रमाणेच रस्त्यावर आला. त्यांच्या ताफ्यात फारशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून निघताना पीएम मोदींच्या गाडीचा ताफा दिल्लीतील एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
#WATCH Early morning today, when PM Modi left for Nowshera, J&K, minimal security arrangements and no traffic restrictions were in place on the route in Delhi (Source: Doordarshan) pic.twitter.com/QJ3DrRtmyy
— ANI (@ANI) November 4, 2021
विशेष म्हणजे मोदींनी कोणत्याही व्हीआयपी रुटशिवाय दिल्ली ते जम्मू प्रवास केला आहे. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात असलेल्या गाड्या आज सकाळी दिल्लीहून निघाली. या ताफ्यासाठी कोणताही व्हीआयपी रुटचा वापर करण्यात आला नव्हता.
हेही वाचा- आधी रोहित पवारांनी इंधन दर कपातीनंतर मानले आभार, नंतर केंद्र सरकारला दिला सल्ला
या प्रवासादरम्यान मोदींच्या वाहनांचा ताफा दिल्लीतल्या एका सिग्नलवर थांबला सुद्धा होता.
लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची त्यांची परंपरा सुरू ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दीपोत्सवानिमित्त जवानांची भेट घेतली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नौशेरा सेक्टरमधील शहीद स्थळी पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी लष्कराचे अधिकारीही तेथे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.