Home /News /national /

शिक्षक पर्व 2021: पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या शिक्षण क्षेत्राला उभारी देणाऱ्या 'या' योजना; विद्यार्थ्यांना केलं संबोधित

शिक्षक पर्व 2021: पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या शिक्षण क्षेत्राला उभारी देणाऱ्या 'या' योजना; विद्यार्थ्यांना केलं संबोधित

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संबोधित करत केलं. तसंच काही योजना लाँच केल्या.

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर: कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना सलाम करण्यासाठी देशभरात 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरदरम्यान शिक्षक पर्व (Shikshak Parv 2021) साजरा केलं जाणार आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान देशात शिक्षक पर्व साजरं केलं जाईल असं जाहीर केलं होतं.. संतोष कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती दिली होती. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संपूर्ण देशाला संबोधित करत केलं. तसंच काही योजना लाँच केल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'शिक्षक पर्व' च्या पहिल्या परिषदेला संबोधित करणाऱ्या पंतप्रधानांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं 'भविष्याचं धोरण' असं वर्णन केलं. तसंच यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे असंही म्हंटल आहे.  यावेळी त्यांनी भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश (Sign language Dictionary), टॉकिंग बुक्स (Talking Books) (दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स), शालेय दर्जाची पुस्तके प्रकाशित केली. तसंच यावरी पंतप्रधानांनी निष्ठा शिक्षक प्रशिक्षण (Nishtha Teacher Training program) आणि विद्यांजली पोर्टल (Vidyanjali Portal) या योजना लाँच केल्या. आज शिक्षक पर्वानिमित्त अनेक नवीन प्रकल्प सुरू झाले आहेत. हा उपक्रम देखील आवश्यक आहे कारण देश सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी भारत कसा असेल यासाठी देश आज नवीन संकल्प घेत आहे. आज सुरु केलेल्या योजना भविष्यातील भारताला घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हंटल आहे. हे वाचा - Breaking: MH CET परीक्षेच्या तारखांची घोषणा; 'या' कालावधीत होणार CET परीक्षा; लवकरच लागणार निकाल जेव्हा समाज एकत्र काहीतरी करतो, तेव्हा अपेक्षित परिणाम नक्कीच मिळतात. आणि तुम्ही पाहिलं आहे की गेल्या काही वर्षांत लोकसहभाग पुन्हा भारताचं राष्ट्रीय चरित्र बनत आहे. त्यामुळे शिक्षणाला आपल्याला लोकसहभागातूनच पुढे न्यायचं आहे असंही पंत्रप्रधान म्हणाले. कोरोनाच्या काळात भारताच्या शिक्षण व्यवस्थेने ऑनलाइन शिक्षणाच्या विविध माध्यमांचा वापर करून जगाला आपली क्षमता दाखवली आहे. याच क्षमतेला आणि प्रयत्नांना आपल्याला आता पुढे न्यायचं आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, बरेच दिवसानंतर शाळेत जाण्याचा, मित्रांना भेटण्याचा आणि बऱ्याच दिवसांनी वर्गात शिकण्याचा आनंद काही औरच आहे. मात्र उत्साहासह  कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणंही महत्त्वाचं आहे. तसंच या झपाट्याने बदलणाऱ्या युगात, आमच्या शिक्षकांनाही नवीन प्रणाली आणि तंत्रांबद्दल जलद शिकावे लागेल. देश 'निष्ठा' प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून या शिक्षकांना या बदलांसाठी तयार करत आहे असंही मोदी म्हणाले.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Narendra modi, Pm modi, Teacher

    पुढील बातम्या