मराठी बातम्या /बातम्या /देश /PM मोदींचा आज केदारनाथ दौरा; महत्त्वाच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचं करणार अनावरण

PM मोदींचा आज केदारनाथ दौरा; महत्त्वाच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचं करणार अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) आज पुन्हा एकदा केदारनाथ दौरा करणार (kedarnath dham visit) आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

देहरादून, 05 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) आज पुन्हा एकदा केदारनाथ दौरा करणार (kedarnath dham visit) आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच 8 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट केली जाणार आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी जवळापास दोन तास या मंदिरात असणार आहेत. यावेळी मोदी विविध महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान ते श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांच्या मूर्तीचं अनावरण देखील करणार आहे.

नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिराला भेट देणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केदारनाथ धाम येथे नरेंद्र मोदी जवळपास दोन तास असणार आहेत. दरम्यान ते याठिकाणी एक भाषणही करणार असून 87 एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवरून याचं प्रसारण केलं जाणार आहे. याशिवाय श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहोचण्याच्या मार्गावरील 87 मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा-जवानांसोबत पंतप्रधानांची दिवाळी, सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा

केदरनाथ धाम यात्रेच्या क्षणाला  ऐतिहासिक स्वरुप देण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण 82 मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केलं होतं. पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी याठिकाणी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील अनेकाचं नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा-PICS: नौशेरामध्ये जवानांना मिठाई भरवून PM मोदींनी साजरी केली दिवाळी

आज सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी नरेंद्र मोदी देहरादूनहून केदारनाथ धामसाठी रवाना होणार आहे. त्याननंतर ते सकाळी साडे आठ वाजेपर्यंत ते केदारनाथ मंदिरात पूजा करणार आहेत. पूजा केल्यानंतर ते केदारनाथ येथील विकास कामाचा आढावा घेणार आहेत. तसेच श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीला भेट देऊन त्यांच्या मूर्तीचं अनावरण करणार आहेत. तसेच 9.50 वाजता ते देशाला संबोधून एक भाषण करणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Narendra modi