VIDEO स्मृती इराणींसमोरच PM मोदी म्हणाले, 'सास भी कभी...'

VIDEO स्मृती इराणींसमोरच PM मोदी म्हणाले, 'सास भी कभी...'

'आयुष्यात कधीच सहजा सहजी काही मिळत नाही. त्यामुळे कठिण परिश्रम करा. परिश्रम करण्यापासून कधीच मागे हटू नका.'

  • Share this:

नवी दिल्ली 24 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार' मिळालेल्या मुलांसोबत संवाद साधला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी या सर्व मुलांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधानांनी धाडस दाखविणाऱ्या सर्व मुलांचं कौतुक केलं आणि सल्लाही दिला. यापुढच्या आयुष्यात वाटचाल करताना काय करावं, आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही उपस्थित होत्या. त्यांच्या समोरच पंतप्रधानांनी त्यांच्या गाजलेल्या मालिकेचा उल्लेख करताच इराणींसह सगळीच मुलं हास्यकल्लोळात बुडून गेली.

पंतप्रधान म्हणाले, मुलंच देशाचं भविष्य आहेत. इथं आलेल्या सगळ्या मुलांनी जे धाडस आणि साहस दाखवलं त्या तुमच्या कहाण्या ऐकून मी प्रभावित झालो आहे. हे धाडस असंच कायम राहू द्या. आयुष्यात कधीच सहजा सहजी काही मिळत नाही. त्यामुळे कठिण परिश्रम करा. परिश्रम करण्यापासून कधीच मागे हटू नका तोच यशाचा मार्ग आहे असंही ते म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मला प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या चेहेऱ्यावर तेज का दिसते? त्यावेळी मी उत्तर दिलं होतं की दिवसभर मी प्रचंड मेहनत करतो. त्यामुळे मला घाम येतो आणि त्याच घामाने मी मॉलीश करतो असं पंतप्रधान म्हणाले.

धक्कादायक : CAAला पाठिंबा दिल्याने दलित वस्तीचं पाणीच तोडलं

मुलांनी घरात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे. तुम्ही पाणीही खूपच घाई घाईत पित असता. तर तुमची आई सुद्धा टीव्ही पाहण्यात व्यस्त असते. ती तुमच्यासाठी दुधाचा ग्लास भरून ठेवते आणि टीव्ही बघत बसते आणि तुम्ही औषधासारखं दूध पिऊन घेता हे चुकीचं आहे. तुम्ही त्याचा आनंद घेत हळूहळू दुध घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले.

निर्भया प्रकरणी 3 दोषींची पुन्हा याचिका, फाशी लांबविण्याची शेवटची धडपड

मुलांची फिरकी घेताना त्यांनी प्रश्न विचारला की, तुमची आई कुठली सिरीयल बघत असते. 'सास भी कभी बहू थी' का? या त्यांच्या प्रश्नावर सगळीच मुलं हसायला लागली. त्यात स्मृती इराणीही सहभागी झाल्या होत्या.

First published: January 24, 2020, 5:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या