मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेस माझी कबर खोदण्याचं स्वप्न बघतंय, तर मी...; पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्लाबोल

काँग्रेस माझी कबर खोदण्याचं स्वप्न बघतंय, तर मी...; पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्लाबोल

Narendra-Modi

Narendra-Modi

भाजपच्या केंद्र सरकारने प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. गरिबांच्या जीवनातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला असेही मोदी म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बंगळुरु, 12 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरु-म्हैसूर एक्सप्रेसवेचे लोकार्पण केले. याआधी पंतप्रधान मोदींनी मांड्यामध्ये रोड शोसुद्धा केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मांड्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस माझी कबर खोदण्याचं स्वप्न बघतंय, तर मी गरिबांचे आयुष्य सुलभ कसं होईल यासाठी काम करतोय असं मोदींनी म्हटलं.

मोदी म्हणाले की, काँग्रेस मोदींची कबर खोदायचं स्वप्न बघत आहे. ते मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहेत, तर मोदी बंगळुरु-म्हैसूर एक्सप्रेस वे बनवण्यात आणि गरीबांचे जीवन सुलभ करण्यात व्यस्त आहेत. तुम्ही जेव्हा २०१४ मध्ये मला मत देऊन सेवा करण्याची संधी दिली तेव्हा देशातील गरिबांचे दु:ख समजून घेणारं संवेदनशील सरकार आलं. यानंतर भाजपच्या केंद्र सरकारने प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. गरिबांच्या जीवनातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला असेही मोदी म्हणाले.

नारायण राणेंचं मंत्रिपद 2 महिन्यात जाणार, कोकणातल्या आमदाराचं भाकित

ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आम्ही ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचं उत्पादन वाढवणार आहे. यामुळे ऊसाचे उत्पादन जास्त झाल्यास त्यापासून इथेनॉल बनवण्यात येईल. इथेनॉलपासून शेतकऱ्याचे उत्पन्नही निश्चित केले जाईल असंही मोदींनी म्हटलं.

बंगळुरु-म्हैसूर एक्सप्रेस योजनेत NH-275च्या बंगळुरु निदाघट्टा म्हैसूर मार्ग ६ पदरी करण्याचाही समावेश आहे. या ११८ किमी लांब योजनेसाठी ८ हजार ४८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल आहे. यामुळे बंगळुरु - म्हैसूर प्रवासाचा वेळ ३ तासांवरून फक्त ७५ मिनिटांवर येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, Narendra Modi