मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, पाटीदार समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न

मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, पाटीदार समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न

  • Share this:

17 एप्रिल :  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहे. सोमवारी सूरतमध्ये मल्टीस्पेशलिटी रुग्णालय, डायमंड प्लान्टचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. हे रुग्णालय पाटीदार समाजाच्या एका ट्रस्टने बांधले आहे. सध्या आरक्षणावरून नाराज असलेल्या पाटीदार समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न मोदी या दौऱ्यात करणार आहेत. यावेळी भाषण करताना त्यांनी गुजरातच्या आठवणी, तिथलं जेवण आणि तिथले लोक, अशा भावनिक गोष्टींनी हात घातला.

400 कोटी रुपये खर्च करुन हे रुग्णालय तयार करण्यात आलं.पण या रुग्णालयात यायची गरज कोणालाही पडू नये, अशी भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली. एखादा व्यक्ती आलाच तर तो इथून बरा होऊन गेला पाहिजे. त्याला पुन्हा या रुग्णालयात येण्याची गरज पडू नये असे मोदींही सांगितले. केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून 700हून अधिक औषधांचे दर कमी केले असून औषध निर्मात्यांच्या मनमानीवर चाप लावल्याचे मोदींनी आवर्जून नमूद केलं. त्याचबरोबर,  स्वस्तात उपचार मिळावं यासाठी लवकरच कायदा तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सूरतसोबत माझे भावनिक नाते आहे. मला पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यावर मी सर्वप्रथम सुरतमध्येच आलो होतो. सूरतच्या लोकांनी माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला अशी आठवण त्यांनी सांगितली. मी गुजरातमध्ये असताना नेहमी म्हणायचो की ज्या कामाचे भूमीपूजन करतो त्याचे उद्घाटनही करणार. तेव्हा अनेकांनी हा माझा अहंकार असल्याची टीका केली. पण मी एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करतोच असे मोदींनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नऊ महिन्यातील हा आठवा गुजरात दौरा आहे. नोव्हेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये भाजपा सलग पाचव्यांदा सत्तेसाठी प्रयत्न करणार आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये मिळालेली विजयाची लय कायम राखणे हा सुद्धा या दौ-यामागे उद्देश आहे.  हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या सूरतमध्ये काल पंतप्रधानांनी जोरदार रोड शो केला. जवळपास 10 हजार बाईक्स या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजपाने या रोड शो मधून शक्तीप्रदर्शन केले. जुलैमध्ये मी इस्त्रायलमध्ये जात असून तुमचा प्रतिनिधी म्हणूनच मी तिथे जात असल्याचे मोदींनी सांगितले. डायमंड प्लान्टचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. इस्त्रायल आणि गुजरातमधील हिरेव्यापाऱ्यांच्या संबंधांना त्यांनी उजाळा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 04:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading