प्रयागराज 24 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज इथं त्रिवेणी संगमानत स्नान केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यानंतर स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ त्यांनी केला. त्यानंतर गोरखपूरला त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराज इथं गेले. त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं आणि गंगापूजन करत आरतीही केली.
लाइव: प्रधानमंत्री @narendramodi कुम्भ में संगम तट पर पूजा कर रहे हैं। https://t.co/eOjAfvQP5g
— BJP (@BJP4India) February 24, 2019
या आधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1954मध्ये कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान केलं होतं. दिव्य कुंभ, भव्य कुंभ हे यावेळच्या मेळ्याचं घोषवाक्य होतं. केंद्र आणि राज्य सरकारने जगभरातल्या भारतीयांना कुंभ मेळ्यात सहभागी होता यावं यासाठी खास प्रयत्न केले होते.
परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्हि.के. सिंग यांनी अनिवासी भारतीयांसोबत हजर राहून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवलं होतं. या वेळच्या अनिवासी भारतीय परिषदेचं दिल्लीत नाही तर वाराणशीत आयोजन करण्यात आलं होतं. कुंभ हा सर्व जगाला सांस्कृतिक धाग्यात जोडणारा दुवा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. स्वच्छता आणि व्यवस्थापनाची यावेळी सरकारने अतिशय चांगली व्यवस्था केली होती
VIDEO: 'शहीद जवानांचा राजकीय बळी, अजित डोवालांची चौकशी करा'