दिल्ली, 26 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या ९९ व्या एपिसोडमध्ये देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात परमार्थ इतका आहे की दुसऱ्याच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व दान करण्यात कोणताही संकोच बाळगत नाहीत. त्यामुळे आपल्याला लहानपणापासूनच शिवि आणि दधीचि यांच्यासारख्या देहदान केलेल्यांच्या गोष्टी ऐकवल्या जात असत. वैद्यकीय विज्ञानाच्या युगात अवयव दान हा एखाद्याला जीवन देण्याचं मोठं माध्यम बनलं असल्याचं म्हणत मोदींनी देशात अवयव दानाचे प्रमाण वाढल्याचं सांगितलं.
मोदी म्हणाले की, एका व्यक्तीने मृत्यूनंतर शरीर दान केलं तर त्यामुळे ८ ते ९ जणांना नवं आयुष्य मिळण्याची शक्यता असतो. अवयवदानाबाबत जागरुकता वाढतेय ही समाधानाची गोष्ट आहे. २०१३ मध्ये देशात ५ हजारांपेक्षा कमी अवयव दान होते पण हीच संख्या २०२२ मध्ये वाढून १५ हजारांवर पोहोचली असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
देशावासियांशी 'मन की बात' प्रेरणादायी, 99 व्या एपिसोडमध्ये PM मोदींनी साधला संवाद
ऑस्कर पुरस्कारात बाजी मारलेल्या Elephant Whisperers डॉक्युमेंटरीबद्दलही पंतप्रधान मोदी बोलले. देशाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल मोदींनी निर्माता गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोंजाल्विस यांचे अभिनंदन केलं. भाभा एटोमिक रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिक जोतिर्मयी मोहन्सी यांनी केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये IUPACचा विशेष पुरस्कार मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra Modi