आमचं सरकार धावणारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी

'आमचा विकास आदर्श सारखा होणार नाही तर हा शाश्वत विकास असेल लोकांपर्यंत पोहोचणारा असेल.'

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 04:21 PM IST

आमचं सरकार धावणारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी

कल्याण,(मुंबई)18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मंगळवारी कल्याणमध्ये 32 हजार कोटींच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधनांनी मराठीत केली. पंतप्रधान म्हणाले मुंबई आणि ठाण्याने देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. या नव्या प्रकल्पांमुळे मुंबईची वाहतूक कोडींची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. लवकरच मुंबईत पावणे तीनशे किलोमीटरचं नवं मेट्रो जाळं निर्माण होईल असंही ते म्हणाले. आदर्श घोटाळ्यावरुनही पंतप्रधानांनी टोला हाणला.


आमचा विकास आदर्श सारखा होणार नाही तर खरा आदर्श असेल असंही ते म्हणाले. गेल्या चार वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा जास्त घरं बांधली गेली. रेरा कायद्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून हा कायदा लागू केल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं.


मुख्यमंत्री काय म्हणाले?

Loading...


मुख्यमंत्र्यांनी या वेळी डोंबिवली मार्गे तळोजा आणि वसई विरारकरांसाठी खास नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली.


गेली अनेक वर्ष विविध प्रकल्प रखडले होते. ते भाजप सरकारने मार्गी लावले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाणे भिवंडी, डोंबिवली कल्याण हा भागा मुंबईपासून दुरावला होता. लोकलवर प्रचंड ताण येत होता. तो ताण दूर करण्यासाठी हे प्रकल्प आखण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


गेल्या 70 वर्षात वाढीव 70 लाख प्रवाशांची सोय करण्यात आली. मात्र गेल्या चार वर्षात दिड कोटी नवे प्रवासी प्रवास करू शकतील असं मुख्यमंत्री म्हणाले.  मुंबईच्या इतिहासात झाले नाही एवढे प्रकल्प मार्गी लागल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दीड लाख कोटींचे प्रकल्प मार्गी लागले आहेत.


सिडकोच्या 90 हजार घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. 18 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. वाहतूकीच्या सर्व साधनांपासून ही घरं जवळ असणार आहेत अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.


या मेट्रो मार्गाचं झालं भूमिपूजन


मेट्रो 5 : ठाणे - भिवंडी - कल्याण

लांबी - 25 किमी, 17 उन्नत स्टेशन्स


मेट्रो 9 : दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर

लांबी - 10 किमी,  8 उन्नत स्टेशन्स

VIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...