पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, वाचा काय आहे 'कर्फ्यू आणि लॉकडाऊन'मधील फरक?

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, वाचा काय आहे 'कर्फ्यू आणि लॉकडाऊन'मधील फरक?

कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519 वर पोहोचला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं. जनतेशी संबोधित करताना रात्री 12 पासून सर्व देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी देशवासियांना रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर जनतेने कडकडीत बंद पाळला होता. तर 5 वाजता आपल्या गॅलरीत येत सगळ्यांनी थाळीनाद करत डॉक्टर्स आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले होते.

हेही वाचा...आज रात्री 12 वाजल्यापासून 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका असं तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी सांगतो आहे असंही ते म्हणाले. ज्या देशांनी अशा प्रकारचे उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधान म्हणाले, 22 मार्चला देशवासियांनी जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. मानवता आणि देशावर संकट आलं तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येवून त्याचा सामना करतो हे जगाला दाखवून दिलं आहे. जगातल्या शक्तिशाली देशांनाही कोरोनाने गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे.

कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते. असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा..आता संपूर्ण नागपुरात होणार 'कोरोना' सर्व्हे, महापालिकेनं उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

कर्फ्यू (संचारबंदी) म्हणजे काय?

कोणत्याही भागात कर्फ्यू लावल्यास नागरिकांना अंतिम मुदतीपर्यंत घरातच राहण्याचे आदेश दिले जातात. आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारकडून कर्फ्यू लावला जातो. कर्फ्यूच्या प्रशासकीय आदेशानंतर लोकांना घराच्या बाहेर रस्त्यांवर न जाण्याचं आवाहन केलं जातं. कर्फ्यूदरम्यान शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा सर्व बंद राहतात. सरकारने लावलेल्या कर्फ्यूच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यास अटक केली जाऊ शकते व त्याला दंडही होऊ शकतो.

लॉकडाऊन म्हणजे काय?

लॉकडाऊन ही आपत्कालीन व्यवस्था आहे जी नागरिकांना वेगवेगळं ठेवण्यासाठी केली जाते. लॉकडाऊनच्या वेळी लोकांना एखाद्या क्षेत्रात किंवा इमारतीत राहाण्याची सूचना देण्यात आली असल्यास ते तत्सम भाग सोडून बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर पडण्यास त्यांना मनाई असते. केवळ आवश्यक गोष्टींसाठी बाहेर जाण्याची परवानगी असते. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवल्या जातात, परंतु त्या सेवा कोणत्या असाव्यात हे प्रशासनावर अवलंबून असते. तसं पाहता बँका, बाजारपेठ, भाजीपाल्याची दुकाने, दुग्धशाळा आदी बाबी खुल्या ठेवल्या जातात. एखादा व्यक्ती औषध, अन्न तत्सम वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडू शकतो.

हेही वाचा...'मी आज काही बंद करायला आलेलो नाही' , मुख्यमंत्र्यांनी केली सहकार्याची अपेक्षा

कर्फ्यू आणि लॉकडाऊनमधील फरक

कर्फ्यू आणि लॉकडाऊन या दोन्ही वेगवेगळ्या परिस्थितीत लागू केल्या जातात. प्रशासनाने सुरू ठेवलेल्या बाबींनुसार दोघांमधील फरक लक्षात येतो. एखाद्या ठिकाणी दंगल किंवा हिंसाचार झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कर्फ्यू लावते. कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकासारख्या अत्यावश्यक सेवा बंद राहतात. जेव्हा कर्फ्यू शिथिल होतो तेव्हाच लोकांना या सर्व सेवांचा लाभ मिळतो आणि ते बाहेर पडू शकतात.

लॉकडाऊनमध्ये आवश्यक असलेल्या सेवा थांबविल्या जात नाहीत. याक्षणी आपल्या देशात आहे अगदी तसंच. सद्य परिस्थितीत देशातील अनेक राज्ये आणि शहरांमध्ये लॉकडाऊन केले गेले आहे. परंतु बँका, दुग्धशाळा, जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकाने खुली आहेत. जनतेसाठी आवश्यक सेवा सुरू आहेत. मात्र बहुतांश सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

First published: March 24, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या