कृषी विधेयकांच्या समर्थनासाठी पंतप्रधान मैदानात, विरोधकांवर केला गंभीर आरोप

कृषी विधेयकांच्या समर्थनासाठी पंतप्रधान मैदानात, विरोधकांवर केला गंभीर आरोप

Agricultural Bills: किमान आधारभूत किंमत आणि सरकारची खरेदी या दोन्ही गोष्टी सुरूच राहणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 18 सप्टेंबर: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना (Agricultural Bills) होणारा विरोध आणि केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता मैदानात उतरले आहेत. बिहारमधल्या विविध रेल्वे विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं असून केवळ दलालांचा फायदा व्हावा यासाठीच या विधेयकांना विरोध होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ही विधेयके शेतकरी विरोधी आहेत असं सांगत केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे पंतप्रधान काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांसाठी जेवढं एनडीए सरकारने केलं तेवढं कुणीही केलेलं नाही.

काही पक्षांनी घोषणापत्रात या मुद्यांचा समावेश केला, देशावर अनेक दशके राज्य केले मात्र निवडून आल्यावर काहीही केलं नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसचं नाव न घेतला केली. दलालांच्या फायद्यासाठीच कृषी विधेयकांना विरोध होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगरमधल्या 23 गावांसाठी शरद पवारांचा पुढाकार, संरक्षणमंत्र्यांची घेतली भेट

शेतकऱ्यांसाठी ही विधेयकं ही क्रांतिकारी ठरणार आहेत. शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होणार आहे. शेतकरी सोडून उत्पादन करणारा प्रत्येकाला आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे. मात्र शेतकऱ्यालाच तो अधिकार नव्हता. त्याच बरोबर शेतकरी आपला माल जगाच्या बाजारपेठेत विकू शकत नव्हता. आता या विधेयकांमुळे शेतकरी आपला माल त्याला पाहिजे त्या ठिकाणी विकू शकेल आणि त्याची किंमतही ठरवू शकणार आहे.

किमान आधारभूत किंमत आणि सरकारची खरेदी या दोन्ही गोष्टी सुरूच राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

या विधेयकाला देशभरातून मोठा विरोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे, हा नवीन कायदा लागू झाल्यास कृषी क्षेत्र भांडवलदारांच्या हातात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार, हमीभावाती पद्धत देखील संपुष्टात येईल.

भारतात कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल ऑक्सिजनाचा पुरवठा घटला, का जाणवतोय हा तुटवडा?

त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसल्याची भीती देखील  व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कमिशन एजंटचं कमिशन बुडणार असल्याची भीती एजंटांनी व्यक्त केली आहे. पंजाबमध्ये जवळपास 12 लाख शेतकरी कुटुंब असून सर्वांनाच याचा फटका बसणार आहे.

नव्या कृषी विधेयकाविरोधात प्रामुख्याने तीन राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यात पंजाबचा समावेश आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2020, 3:49 PM IST

ताज्या बातम्या