दलालाने तोंड उघडलं तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पोल खोल - पंतप्रधान मोदींचा इशारा

दलालाने तोंड उघडलं तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पोल खोल - पंतप्रधान मोदींचा इशारा

'राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांची धड नावं घेता येत नाहीत. त्यांनी हातात कागद न घेता काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांची नावं म्हणून दाखवावीत'

  • Share this:

जयपूर, 5, डिसेंबर : राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ऑगस्टा वेस्ट लँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदीच्या घोटाळ्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, या भ्रष्टाचारातल्या दलालाला सीबीआयने ताब्यात घेतलंय. तो दलाल आता गुपीतं उघडे करणार आहे.

ही गुपीतं बाहेर आलीत तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लक्तरं वेशीवर टांगली जातील. सीबीआयने या प्रकरणातला दलाल ख्रिस्टिन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेतलंय. राजस्थानमधल्या सुमेरपूर इथं पंतप्रधानांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, राहुल गांधी म्हणतात की मी भ्रष्टाचारावर बोलत नाही. काँग्रेस स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी असा आरोप करतेय. 2014 च्या निवडणुकीत मी वेस्ट लँडच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता आणि आता त्याच्या आरोपीला अटक केलीय. हाच दलाल राहुल गांधींच्या मित्रांना पैसा पुरवत होता असा थेट आरोप त्यांनी केला.

सोनिया गांधी यांच्या इन्कम टॅक्स प्रकरणात चौकशी करण्याची पवानगी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलीय. यातही मोठा घोटाळा गांधी कुटुंबाने केला आहे. कोर्टानं दिलेल्या जमीनावर सोनिया आणि राहुल गांधी बाहेर फिरत असून जामीनावर असलेल्या नेत्यांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का असा सवालही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांची धड नावं घेता येत नाहीत. त्यांनी हातात कागद न घेता काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांची नावं म्हणून दाखवावीत असं आव्हान मी त्यांना देतो असंही ते म्हणाले.

धक्कादायक VIDEO : विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण

First published: December 5, 2018, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading