गरिबी हटवण्याच्या नावाखाली काँग्रेस राजकारणाचा धंदा करतंय - अरुण जेटली

गरिबी हटवण्याच्या नावाखाली काँग्रेस राजकारणाचा धंदा करतंय - अरुण जेटली

अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : गरिबी हटवण्याच्या नावाखाली काँग्रेस राजकारणाचा धंदा करत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. काँग्रेस सत्तेवर आली तर देशातल्या गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. देशात 20 टक्के गरीब असून त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. देशात भरपूर पैसे असून हे पैसे देणे शक्य आहे असा दावाही त्यांनी केला. ज्यांचं उत्तपन्न 12 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून आता अरूण जेटली यांनी राहुल गांधी यांच्या घोषणेवर टीका केली. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी गरिबांना सर्व काही दिलेलं आहे, असं देखील अरुण जेटली यावेळी म्हणाले.

5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना या योजनेचा थेट फायदा होईल असा दावाही राहुल गांधी यांनी केला. या आधीही राहुल गांधी यांनी गरीबांना किमान वेतन देण्याची घोषणा केली होती. राहुल गांधी यांच्या या घोषणेमुळे नवी राजकीय चर्चा होणार आहे. या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून हे शक्य आहे असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर श्रीमंतांचं लाखो कोटींचं कर्ज माफ करू शकतात तर काँग्रेस गरीबांसाठी हे पैसे का देऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.

मतदानाला काही दिवस राहिले असल्याने राहुल गांधींनी केलेल्या या घोषणेवर आता पुन्हा जोरदार राजकीय होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading