मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधानांनी सैन्याला सोपवले अर्जुन रणगाडे, वाचा शत्रूंना का भरणार धडकी!

पंतप्रधानांनी सैन्याला सोपवले अर्जुन रणगाडे, वाचा शत्रूंना का भरणार धडकी!

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चेन्नईमध्ये त्यांनी 118 हायटेक अर्जुन रणगाडे (MK – 1A) सैन्याला सोपवले. पंतप्रधानांनी यावेळी सलामी देखील दिली.

    चेन्नई, 14 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चेन्नईमध्ये 118 हायटेक अर्जुन रणगाडे (MK – 1A) सैन्याला सोपवले. पंतप्रधानांनी यावेळी सलामी देखील दिली. या कार्यक्रमाला लष्कर प्रमुख (Army Chief) मनोज मुकुंद नरवणे ( Manoj Mukund Naravane) देखील उपस्थित होते. DRDO नं 8400 कोटी रुपये खर्च करुन हे रणगाडे तयार केले आहेत. (वाचा - मोठी बातमी! पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली, जम्मूमधून विस्फोटक साहित्य जप्त) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पुलवामा हल्ल्यात (Pulwama attack) हुतात्मा झालेल्या सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. “या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. आम्हाला आमच्या सुरक्षा दलाचा अभिमान आहे. त्यांचं शौर्य आपल्याला प्रेरणा देत राहील.'' असं पंतप्रधानांनी सांगितलं. अर्जुन 1 A ची मुख्य वैशिष्ट्ये >> हा रणगाडा सतत हलचाल करणाऱ्या टार्गेटलाही अचूक लक्ष्य करतो. भू सुरुंग पेरली असतील तरी हा त्यावरुन पुढे जाऊ शकतो. त्याचबरोबर या रणगाड्यासमोर ग्रेनेड आणि क्षेपणास्त्र हल्ले देखील निष्प्रभ ठरतात. >> या रणगाड्यांमध्ये केमिकल हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर लावण्यात आले आहेत. पश्चिम राजस्थानातील सैन्याच्या रेजिमेंटच्या मदतीला हे रणगाडे असतील. याचा नेमका अर्थ म्हणजे या रणगाड्यांच्या टार्गेटपासून पाकिस्तान फार दूर नसेल. >> अर्जुन 1 A रणगाड्यांना ‘किलर रणगाडे’ असंही म्हंटलं जातं. एक रणगाडा तयार करण्यासाठी 54 कोटी रुपये खर्च आला आहे. रविवारी 118 रणगाडे सैन्यात दाखल झाली आहेत. 124 रणगाडे पूर्वीपासून सैन्याकडं आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indian army, PM narendra modi

    पुढील बातम्या