• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी नेत्यांची लगबग होती. विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 डिसेंबर : काँग्रसेच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रविवारी 72 वा वाढदिवस साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरून सोनिया गांधींना वाढिदवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनियाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना असं पंतप्रधनांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी नेत्यांची लगबग होती. विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. तर अनेक नेत्यांनी ट्विटरवरून सोनिया गांधींचं अभिष्टचिंतन केलं. युपीएतले मित्र पक्ष असलेल्या विविध नेत्यांनीही सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डीएमकेचे नेते एम के स्टॅलिन, खासदार कनिमोळी, माजी केंद्रीय मंत्री डी. राजा यांनी सोनियाजींच्या घरी जावून त्यांना पुष्प गुच्छ आणि शॉल भेट दिली. असा आहे सोनियांचा राजकीय प्रवास 1997 मध्ये त्यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं आणि 1998 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्या राजीव गांधींचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीतून खासदार म्हणून पहिल्यांदा  लोकसभेवर निवडून गेल्या. आणि नंतर विरोधीपक्ष नेत्या बनल्या. नंतर अमेठी हा मतदारसंघ त्यांनी राहुल गांधींना मोकळा करून दिला. त्यानंतर त्या रायबरेली या मतदार संघातून 2004, 2009 आणि 2014 मध्ये सलग विजयी झाल्या. या राजकीय प्रवासात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टिकेचे प्रहार तर केलेत पण पक्षाचे दिग्गज नेते शरद पवार यांनी त्या मुद्दावरून काँग्रेसपक्ष सोडून नव्या पक्षाची स्थापना केली. भारताच्या पंतप्रधान पदावर विदेशी जन्माची व्यक्ती नको अशी त्यांची भूमिका होती.

  PHOTOS : Birthday Special : 'इटली ते नवी दिल्ली', सोनिया गांधींच्या रोमहर्षक प्रवासाची कहाणी

  सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेसने उभारी घेतली. 2004 ते 2014  या काळात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्याची किमया करून दाखवली. युपीए-1 च्या वेळी सोनियाच पंतप्रधान होतील असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र निर्णय घेण्याच्या क्षणी अंतरात्म्याचा आवाज ऐकत माघार घेतली आणि मनमोहन सिंग यांचं नाव पुढे केलं. 2017 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली आणि त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या. इटली ते नवी दिल्ली हा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. मात्र त्या सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी आपण 100 टक्के भारतीय संस्कृतीत मिसळल्याचं सिद्ध केलंच त्याच बरोबर काँग्रेसपक्षाला नवी उभारीही दिलीय.
  First published: