मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुलीच्या लग्नाचं PM मोदींना दिलं निमंत्रण, आशीर्वाद म्हणून रिक्षा चालकाला मिळालं....

मुलीच्या लग्नाचं PM मोदींना दिलं निमंत्रण, आशीर्वाद म्हणून रिक्षा चालकाला मिळालं....

मुलीच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविणाऱ्या रिक्षाचालकाला काय मिळालं उत्तर वाचा सविस्तर.

मुलीच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविणाऱ्या रिक्षाचालकाला काय मिळालं उत्तर वाचा सविस्तर.

मुलीच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविणाऱ्या रिक्षाचालकाला काय मिळालं उत्तर वाचा सविस्तर.

  • Published by:  Kranti Kanetkar
वाराणसी, 16 फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता तुफान आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिक्षा चालकाच्या मुलीला थेट पत्र पाठवून आशीर्वाद दिले आहेत. या लग्नासाठी उपस्थित राहू न शकल्यानं त्यांनी रिक्षा चालकाच्या मुलीला पत्र पाठवलं. हे पत्र वाचून रिक्षा चालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. या रिक्षा चालकाच्या मुलीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून का आशीर्वाद दिले असा प्रश्न पडला असेल? उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातील रिक्षा चालकानं थेट आपल्या मुलीच्या लग्नासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण धाडलं. त्यासोबत आपल्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे यासाठी नम्र विनंती या रिक्षा चालकानं केली होती. वाराणसीतील एका छोट्या दोमरी गावात रिक्षा चालकाच्या मुलीचा 12 फेब्रुवारी रोजी विवाह संपन्न झाला. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहावं अशी त्याची मनोमन इच्छा होती. त्याने प्रयत्नही केले. मात्र काही कारणांमुळे ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या लग्नासाठी उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे मोदींनी पत्र लिहून रिक्षा चालकाच्या मुलीला आशीर्वाद दिला. हेही वाचा-रक्ताअभावी उपचार थांबलेल्या रुग्णासाठी आरोग्यमंत्री धावले, स्वत: केलं रक्तदान दोमरी गाव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेलं गाव आहे. या गावातील रिक्षाचालक मंगल केवट यांनी आपल्या मुलीच्या विवाहाचं निमंत्रण पंतप्रधान मोदी कार्यालयात पाठवलं होतं आणि विवाहाला आवर्जुन उपस्थित राहण्याची विनंतीही केली होती. मात्र काही कारणांमुळे पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकले नाहीत यासाठी त्यांनी पीएमओ कार्यालयाकडून पत्र पाठवून केवट यांच्या मुलीला सुखी संसारासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा-शुभमन गिल फेल तर पंत, पृथ्वीचा कमबॅक! न्यूझीलंडविरुद्ध कोणाला देणार विराट संधी
First published:

Tags: PM narendra modi

पुढील बातम्या