Home /News /national /

Twitter वरच्या मोदीभक्ताला साक्षात पंतप्रधानांकडून मिळाली New Year Gift!

Twitter वरच्या मोदीभक्ताला साक्षात पंतप्रधानांकडून मिळाली New Year Gift!

एका Twitter यूजरला 1 जानेवारी 2020 च्या संध्याकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याची मनोकामना साक्षात पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली. या इच्छापूर्तीची पूर्ण कहाणी अशी...

    नवी दिल्ली, 1 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या एका भक्ताने नव्या वर्षानिमित्त (New Year) आपली एक मोठी इच्छा पूर्ण व्हावी, अशी मनोकामना Twitter वरून व्यक्त केली. आपण पंतप्रधानांचे चाहते आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला नवीन वर्षाची भेट (New Year's gift) मिळेल का, अशी विचारणा करणाऱ्या या Twitter यूजरला 1 जानेवारी 2020 च्या संध्याकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याची मनोकामना साक्षात पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली. या इच्छापूर्तीची पूर्ण कहाणी अशी... अंकित दुबे नावाच्या Twitter युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून नवीन वर्षात आपली इच्छा पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आदरणीय पंतप्रधान, मी तुमचा मोठा चाहता आहे, प्रशंसक आहे. मला नव्या वर्षाची तुमच्याकडून एक भेट मिळेल का? मी तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही मला Twitter वर फॉलो बॅक कराल का? अशी विनंती अंकितने केली. त्याला संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत Twitter हँडलवरून उत्तर मिळालं. नरेंद्र मोदींनी अंकितला फॉलो केलं आणि वर नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. अंकित दुबे  स्वतःला स्वयंसेवक म्हणवून घेतो. भाजपचा कार्यकर्ता आणि नरेंद्र मोदींचे आशीर्वाद मिळालेला कार्यकर्ता असल्याचा उल्लेख त्याच्या Twitter Bio मध्ये आढळतो. अंकित व्यवसायाने इंजिनीअर असून राजकारण ही आपली पॅशन असल्याचा उल्लेख त्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर अॅक्टिव्ह असतात. त्यांनी घालून दिलेल्या संकल्पांनुसार वागणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांचे Tweet ते शेअर करतात. Retweet करतात. अंबिकापूरच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं ट्वीट त्यांनी याच प्रकारे शेअर केलं आहे. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक वापर बंदीच्या उपक्रमाला पुढे नेणाऱ्या अनेकांना मोदींनी शुभेच्छा देत कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या Twitter handle वरून अशा उपक्रमांची सातत्याने दखल घेताना दिसतात. ------------------------------------ अन्य बातम्या दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण, 2 महिन्यांची लेक पोरकी निर्भया प्रकरणात चारही आरोपींना एकाच वेळी देणार फाशी, तिहारमध्ये अशी केली तयारी युद्ध झालं तर? अणुबॉम्बचा हल्ला टाळण्यासाठी भारत आणि पाकने घेतला मोठा निर्णय खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Modi twitter, Narendra Modi (Politician), Pm modi, Twitter

    पुढील बातम्या