• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • नांदेड-हैदराबाद विमानसेवेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

नांदेड-हैदराबाद विमानसेवेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

पहिल्या टप्प्यात नांदेड-हैदराबाद, कडप्पा-हैदराबाद आणि शिमला-दिल्ली मार्गावर आजपासून ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.

  • Share this:
27 एप्रिल :   पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी उडान योजनेंचा शुभारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड-हैदराबाद, कडप्पा-हैदराबाद आणि शिमला-दिल्ली मार्गावर आजपासून ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी शिमल्यातून या योजनेचं लोकार्पण करणार आहेत. जवळपास 500 किमीसाठी एक फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट असेल, ज्याच्या माध्यमातून 1 तासाच्या प्रवासासाठी किंवा हेलिकॉप्टरने अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी भाडं फक्त 2500 रुपये असेल. दरम्यान, नांदेड इथल्या विमानतळावरून गुरुवारपासून अवघ्या 950 रुपयांत तुम्हाला हैदराबाद गाठता येईल. सोबतच एक मेपासून नांदेड-मुंबई अशी सेवाही सुरू करण्यात येणार आहे. ट्रू जेट कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नांदेड विमानतळावरून दोन वर्षांपूर्वी नांदेड-मुंबई अशी विमान सेवा स्पाइस जेट विमान कंपनीकडून सुरू करण्यात आली होती. या विमान सेवेला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ही सेवा काही दिवसानंतर बंद करण्यात आली. त्यानंतर आता ट्रू जेट विमान कंपनीने या विमानतळाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published: