'भारत द्वेषाच्या राजकारणावर चालणार नाही', दिल्लीमधल्या पहिल्याच सभेत मोदींचं वक्तव्य

'भारत द्वेषाच्या राजकारणावर चालणार नाही', दिल्लीमधल्या पहिल्याच सभेत मोदींचं वक्तव्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापत चाललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या शहादरामध्ये पहिली सभा घेतली.एकविसाव्या शतकातला भारत द्वेषाच्या राजकारणावर नाही तर विकासाच्या धोरणावर चालेल, असं मोदी म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापत चाललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या शहादरामध्ये पहिली सभा घेतली.एकविसाव्या शतकातला भारत द्वेषाच्या राजकारणावर नाही तर विकासाच्या धोरणावर चालेल, असं मोदी म्हणाले.भारताच्या फाळणीनंतर जे लोक दिल्लीत आले त्यांनी दिल्ली बदलली आहे. जे इथे स्थिरावले त्यांनी दिल्लीच्या विकासात योगदान दिलं. दिल्लीच्या मातीत इथल्या लोकांनी घाम गाळला आहे, असं त्यांनी सांगितलं.

दिवसरात्र मेहनत

8 फेब्रुवारीला दिल्लीत होणारं मतदान फक्त दिल्लीलाच नाही तर देशाचा विकास उंचीवर नेणारं असेल. भाजप नकारात्मक नाही तर सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवतं. आमच्यासाठी देशाचं हित सगळ्यात मोठं आहे. देशासमोर जी आव्हानं होती ती सोडवण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करत आहोत,असंही मोदी म्हणाले.

(हेही वाचा : 'मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग', केजरीवाल यांची भाजपवर टीका)

झुग्गीसारख्या छोट्याछोट्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना पक्कं घर देण्यासाठी वेगाने काम केलं जाईल, असं मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये बेकायदेशीर वसाहतींची समस्या होती. या घरांची नोंदणी आपण करू शकू, असं या नागरिकांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ही नोंदणी प्रत्यक्षात होते आहे, याची त्यांनी आठवण करून दिली.

केजरीवाल यांची मुलाखत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यूज 18 च्या अजेंडा दिल्ली या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. शाहीनबागमधल्या आंदोलनाचा भाजपला फायदा होतोय. हा मुद्दा संपावा असं भाजपला वाटत नाही, असं ते केजरीवाल म्हणाले.भाजपचे नेते फक्त शाहीनबागबद्दलच बोलतात, त्यांच्याकडे हाच एक मुद्दा आहे. मी म्हणतो शाळा बांधा, ते म्हणतात शाहीनबाग. मी म्हणतो, हॉस्पिटल बांधा, ते म्हणतात शाहीनबाग, अशा शब्दांत केजरीवाल यांनी त्यांचा मुद्दा मांडला. दिल्लीच्या जनतेसमोर जे प्रश्न आहेत त्यावरून त्यांना लोकांचं लक्ष वळवायचं आहे, असंही ते म्हणाले.

=====================================================================================

First published: February 3, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या