'अमूल'कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खास डुडल, युझर्स म्हणाले 'नो मस्का...'

'अमूल'कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खास डुडल, युझर्स म्हणाले 'नो मस्का...'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमूलने केलेल्या डुडलची का होतेय चर्चा वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 24 फेबुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात उत्साहात स्वागत झालं आहे. त्याच सोबत सोशल मीडियावरही तुफान मीम्स, कॅम्पेनिंग आणि युझर्सनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं जोरात स्वागत केल्याचं पाहायला मिळत आहे. #IndiaWelcomesTrump , #TrumpInIndia आणि #NamasteyTrump असे टॅशहॅग ट्विटरवर ट्रेन्ड होत आहेत. यामध्ये भारतातील दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणारी गुजरातमधील अमूल कंपनीही मागे नाही. अमूलनेही डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वगत करण्यासाठी छान चित्र आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलं आहे.

अमूल नेहमीच चालू घडामोडींवर जाहिराती किंवा डुडल तयार करत असतं. यावेळीही अमूलने खास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी डुडल तयार केलं आहे आणि ट्विटरवर सध्या तुफान चर्चेचा विषय झाला आहे. या डुडलमध्ये पाहू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अमूल बटर लावलेला ब्रेड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खावू घालत आहेत. त्यावर 'नमस्कार प्रेसिडेन्ट ट्रम्प' असं स्लोगन देण्यात आलं आहे.

हेही वाचा-VIDEO : ट्रम्प- मेलानिया स्वागतासाठी अहमदाबादच्या रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी

अमूलनं केलेल्या या डुडलला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 'नो मस्का' असंही काही युझर्सनी म्हटलं आहे. ट्रम्प हे दोन दिवस भारतात राहणार आहेत. त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात आलं आहे. त्याच बरोबर त्यांच्या पत्नी मेलेनिया, कन्या इव्हिंका आणि जावईही उपस्थित आहेत. अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं विमानतळावर स्वागत केलं. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून दीड लाख लोक त्यात सहभागी झाले आहेत. उद्या दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे.

हेही वाचा-धक्कादायक! प्रसिद्ध कंपनीच्या ताकामध्ये आढळले बुरशीसारखे पदार्थ

First published: February 24, 2020, 2:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading