भारतातील शिक्षित राजकारणी : मनमोहन सिंग टॉपवर, मोदींचा नंबर कोणता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत विरोधकांकडून वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते.

  • Share this:

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. पण आपण निवडून दिलेल्या राजकारण्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेकांना कुतुहल असतं. कोणत्या नेत्याचं काय आहे शिक्षण? जाणून घेऊयात...

मनमोहन सिंग : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात मास्टर डिर्गी मिळवली आहे. तसंच जॉन कॉलेज, केम्ब्रिज विद्यापीठ इथून अर्थशास्त्रात ट्रिपोस पूर्ण केला आहे. सिंग यांनी 1960 साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टोरल डिग्री (डी.फिल)देखील मिळवली आहे.

डॉ. हर्ष वर्धन : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कानपूरच्या 1979 गणेश शंकर विद्यार्थी मेमोरिअल मेडिकल कॉलेजमधून MBBS ची डिग्री तर 1983 मध्ये मास्टर ऑफ़ सर्जरी (एमएस) ची डिग्री मिळवली आहे.

शशी थरूर : काँग्रेसचे नेते शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे सतत चर्चेत असतात. थरूर यांनी दिल्लीच्या स्टीफन कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी मिळवली आहे. तसंच फ्लेचर स्कूल ऑफ़ लॉ एंड डिप्लोमेसी, टफ्ट्स यूनिवर्सिटी इथून एमए, एमएएलडी ही डिग्री मिळवली आहे.

पी. चिदंबरम : भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी चेन्नईच्या प्रेसीडेंसी कॉलेजमधून स्टॅटेसटिक्समधून BSC ची डिग्री मिळवली आहे. तसंच मद्रास लॉ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन, चेन्नईतून मास्टर डिग्री आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल इथून एमबीएची डिग्री प्राप्त केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी : आपल्या थेट वक्तव्यांमुळे सतत वादात राहणारे सुब्रमण्यम स्वामी उच्चशिक्षित आहेत. त्यांनी हिंदू कॉलेजमधून मॅथमॅटिक्समध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. तसंच इंडियन स्टॅटेसटिक्स इंस्टिट्यूट, कोलकाता इथून स्टॅटेसटिक्समध्ये मास्टर डिग्री आणि हार्वर्ड यूनिवर्सिटीमधून इकोनॉमिक्समध्ये पीएचडी ची डिग्री मिळवली आहे.

कपिल सिबल : माजी कायदेमंत्री असलेल्या कपिल सिब्बल यांनी 1977 साली हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएमची डिग्री मिळवली आहे. तसंच दिल्ली विद्यापीठातून एमए-इतिहास आणि एलएलबीची डिग्री प्राप्त केली आहे.

नजमा हेपतुल्लाह : भाजपच्या माजी उपाध्यक्षा आणि माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्लाह यांनी उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातून झूलॉजीमध्ये एमएससी आणि कार्डिएक एनाटॉमीमधून पीएचडीची डिग्री मिळवली आहे.

अखिलेश यादव : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सिडनी विद्यापीठातून एनव्हारनमेंट इंजिनीअरींगमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

 ज्योतिरादित्य सिंधिया : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हार्वर्ड विद्यापीठातून 1993 मध्ये अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. तसंच 2001 मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची डिग्री प्राप्त केली आहे.

सचिन पायलट : काँग्रेस नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी स्टीफन कॉलेजमधून पदवी मिळवली आहे. तसंच इंस्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंगमध्ये डिप्लोमाची डिग्री प्राप्त केली आहे.

नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत विरोधकांकडून वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते. मात्र विकिपीडियावरील माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1978 साली स्कूल ऑफ ओपन लर्निंग, दिल्ली विद्यापीठ इथून राज्यशास्त्रात पदवी मिळवली आहे. तसंच पाच वर्षानंतर म्हणजेच 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून कला शाखेत मास्टर डिग्री मिळवली आहे.

दरम्यान, राजकीय क्षेत्रात काम करताना शिक्षणासोबतच सामाजिक भान, सर्व क्षेत्रातील समज अशे मुद्देदेखील प्रभावी ठरत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 09:32 AM IST

ताज्या बातम्या