पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. रशियाने ट्वीट करून हा निर्णय जाहीर केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. रशियाने ट्वीट करून हा निर्णय जाहीर केला. रशियाने दिलेला हा पुरस्कार ही जागतिक राजकीय घडामोडींमध्ये मोठी  बातमी असल्याचं मानलं जात आहे. एकाच वेळी रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध दृढ होत असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे. मोदींनी स्वतः केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांनंतर आता ही बातमी येत आहे.
ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपोजल नावाने हा पुरस्कार रशियातला सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो. तो भारताच्या पंतप्रधानांना जाहीर झाला आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींना संयुक्त अरब अमिरातीकडूनही त्यांच्या राष्ट्राचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला होता. ही माहिती  मोहम्मद बिन झायेद यांनी जाहीर केली आहे.  भारताबरोबर आमचे ऐतिहासिक आणि व्यापक राजनैतिक संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी या संबंधांना आणखी चालना मिळाली. त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे.


गेल्या फेब्रुवारीत मोदींना दक्षिण कोरियामध्ये सोल शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.


VIDEO: मनेका गांधी यांचं आक्षेपार्ह वक्तव्य; मुस्लिमांना उद्देशून म्हणाल्या, मतं द्या नाहीतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या