मराठी बातम्या /बातम्या /देश /

संपत्तीमध्ये 26 लाखांची वाढ, 1 कोटींची जमीन दान, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मालमत्ता!

संपत्तीमध्ये 26 लाखांची वाढ, 1 कोटींची जमीन दान, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मालमत्ता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi Wealth) त्यांच्या संपत्तीची घोषणा केली आहे. मोदींकडे 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे, यातली बहुतेक संपत्ती ही बँक डिपॉझिट आहेत.

  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi Wealth) त्यांच्या संपत्तीची घोषणा केली आहे. मोदींकडे 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे, यातली बहुतेक संपत्ती ही बँक डिपॉझिट आहेत. पंतप्रधानांकडे आता स्थावर मालमत्ता नाही कारण त्यांनी गुजरातच्या गांधीनगरमधली जमीन दान केली. या जमिनीची किंमत 1.1 कोटी रुपये होती. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर संपत्तीचं डिक्लेरेशन देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2022 पर्यंत मोदींची संपत्ती 2 कोटी 23 लाख 82 हजार 504 रुपये आहे. पंतप्रधानांची जंगम मालमत्ता मागच्या वर्षीच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांनी वाढली आहे. मागच्या वर्षी त्यांच्याकडे 1.1 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. पंतप्रधानांनी कोणतेही बॉण्ड, शेयर किंवा म्युचल फंडामध्ये गुंतवणूक केलेली नाही, तसंच त्यांच्याकडे कोणतंही वाहनही नाही. मोदींकडे 4 अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1.73 लाख रुपये आहे. 31 मार्च 2021 पर्यंत मोदींकडे 1.1 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. मोदींनी ऑक्टोबर 2002 साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना जमीन विकत घेतली होती. या जमिनीवर आणखी तीन जणांचीही मालकी होती, यात मोदींच्या नावावर एक चथुर्तांश हिस्सेदारी होती, हीच त्यांनी दान केली आहे. 1.89 लाखांचा इन्श्यूरन्स 31 मार्च 2022 पर्यंतच्या माहितीनुसार पंतप्रधानांकडे 35,250 रुपये कॅश होती. तर पोस्टात त्यांच्या नावावर 9 लाख 5 हजार 105 रुपये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये आहेत. याशिवाय मोदींच्या नावावर 1 लाख 89 हजार 305 रुपयांचा लाइफ इन्श्यूरन्सही आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही जाहीर केली संपत्ती मागच्या आर्थिक वर्षात सगळ्या 29 कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्यी आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती जाहीर केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे 2.54 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2.97 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य शिंदे, आरके सिंग, हरदीप सिंग पुरी, पुरुषोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांनीही त्यांच्या संपत्तीची घोषणा केली आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनीही त्यांच्या मालमत्तेची घोषणा केली आहे. नकवी यांनी जुलै महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता.
First published:

Tags: Narendra modi

पुढील बातम्या