अमिताभ आणि ट्रम्प यांना मागे टाकून मोदी जगात 'नंबर वन', हा केला रेकॉर्ड!

अमिताभ आणि ट्रम्प यांना  मागे टाकून मोदी जगात 'नंबर वन', हा केला रेकॉर्ड!

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी अतिशय प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करून ऐतिहासिक विजय मिळवला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 13 ऑक्टोंबर :  सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणखी एक नवा विक्रम केलाय. इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Instagram) यांच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 30 मिलियन्सवर गेलीय. त्यामुळे अनेक नेते आणि अभिनेत्यांपेक्षा मोदींची Instagram फॉलोअर्सची संख्या जगात सर्वात जास्त आहे. यात मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष (Donald Trump) आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनाही मागे टाकलंय. एवढच नाही तर बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खानही (Salman Khan) मोदींच्या मागे आहेत.

आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यास तयार, नितेश राणेंनी पुढे केला मैत्रीचा हात

Instagramवर डोनाल्ड ट्रम्प यांचे 14.9 मिलियन,  बराक ओबामांचे 24.6, अमिताभ बच्चन 13.7,  शाहरुख  खानचे 18.5, सलमान खानचे 26.8 आणि सचिन तेंडुलकरचे 17.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.

याआधी मोदी ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असणारे भारतीय बनले होते. ते ट्विटरवर 2 हजारांपेक्षा जास्त जणांना फॉलो करतात मात्र इन्स्टाग्रामवर ते कुणालाही फॉलो करत नाहीत. मोदी हे 2009 पासून सोशल मीडियावर सक्रिय आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत होते. जगभरातल्या ज्या मोजक्या नेत्यांनी सोशल मीडियाचा अतिशय प्रभावीपणे वापर केला त्यात मोदींचा समावेश होतो.

चंद्रावर जाऊन तरुणांचं पोट भरणार का? राहुल गांधींचा मोदींना सवाल!

मोदी विदेश दौऱ्यांमध्ये ज्या देशात जातील त्या देशाच्या भाषेत ट्विटकरून त्या देशातल्या लोकांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्ये जगभरातल्या नेत्यांचा समावेश आहे. अतिशय कमी वेळात, कमी पैशांमध्ये लोकांशी संवाद साधणारं हे महत्त्वाचं साधण असल्याचं मोदींनी अनेकदा सांगितलं आहे. दरमहिन्यात मन की बातच्या आधी किंवा इतर भाषणांच्या आधीही मोदी लोकांकडून भाषणांसाठी सूचना आणि प्रस्ताव मागवतात, अनेकदा फोटोही मागवतात. त्यांच्या या आवाहनला प्रचंड प्रतिसाद मिळतो. लाखो लोकांनी यात सहभाग घेतलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी अतिशय प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी केला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 13, 2019, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading