काँग्रेसचं लोकांशी नातं आणि जमिनीपासून नाळही तुटली - नरेंद्र मोदी

काँग्रेसने फक्त मुस्लिमांची दिशाभूल केली त्यांच्यासाठी काहीही केलं नाही. आम्ही रेषा खोडण्याचा कधी प्रयत्न करत नाही आणि वेळही वाया घालवत नाही. तर आम्ही मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न करतो.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 06:26 PM IST

काँग्रेसचं लोकांशी नातं आणि जमिनीपासून नाळही तुटली - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली 25 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत काँग्रेसवर हल्लाबोल केला. चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जे आरोप केले होते त्या आरोपांना मोदींनी जोरदार उत्तर दिलं. अजुनही अनेक जण हे निवडणुकीच्या वातावरणातच आहेत. पराभवाच्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत असा टोलाही त्यांनी हाणला. काँग्रेस एवढ्या उंचीवर गेलीय की त्यांना जमिनीवरचं काहीच दिसत नाही आणि त्यांची जमिनीपासून नाळही तुटली अशी टीकाही केली.

मोदी म्हणाले, आम्ही रेषा खोडण्याचा कधी प्रयत्न करत नाही आणि वेळही वाया घालवत नाही. तर आम्ही मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न करतो. गेल्या पाच वर्षात आम्ही हाच प्रयत्न केला असंही ते म्हणाले. तुमची उंची तुम्हाला लख लाभ असो असंही त्यांनी सांगितलं. सगळं काही आम्हीच केलं इतरांनी काहीच केलं नाही असं आम्ही म्हणतो असा आरोप आमच्यावर कायम केला जातो. मात्र हा आरोप खोटा आहे. 15 ऑगस्टच्या भाषणा मी आत्तापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांचं आणि सरकारांचं कौतुक करत आभार मानले होते. असं करणारा मी कदाचित पहिलाच पंतप्रधान असेल असंही मोदी म्हणाले.

काँग्रेसला दिलं आव्हान

Loading...

यावरून त्यांनी काँग्रेसला आव्हानही दिलं. काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारचं कौतुक केलं हे दाखवून द्यावं असं आव्हानच त्यांनी काँग्रेसला दिलं. एवढच नाही तर काँग्रेसचे नेते नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांच्या कामाचाही कधी अभिमानाने उल्लेख काँग्रेसचे नेते करत नाहीत. एका कुटुंबाच्या पलिकडे ते कधीच जात नाहीत. अशा लोकांनी आमच्या टीका करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असंही त्यांनी सुनावलं.

काँग्रेसने केले मुस्लिमांची दिशाभूल

काँग्रेसने फक्त मुस्लिमांची दिशाभूल केली त्यांच्यासाठी काहीही केलं नाही असा आरोपही त्यांनी केला. समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण अशा अनेक घटनांमध्ये काँग्रेसने चुका सुधारण्याच्या संधी घालवल्या अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...